ई-वाहनांना महावितरणची ‘पॉवर’; चार्जिंग स्टेशनवर विजेची मागणी तिप्पट वाढली

पुणे – राज्यामध्ये विजेवर चालणाऱ्या वाहनांसाठी होणारी चार्जिंग स्टेशनवर विजेची विक्री गेल्या वर्षी सप्टेंबर 2022 मध्ये 4 लाख 56 हजार युनिटवरून वाढून जुलै 2023 मध्ये 14 लाख 44 हजार युनिट झाली असून, वीजविक्रीत दहा महिन्यांत तीनपट वाढ झाली आहे, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेशचंद्र यांनी दिली. राज्यात महावितरणची आणि खासगी अशी एकूण 3,214 चार्जिंग स्टेशन आहेत. त्या माध्यमातून वाहनांसाठी झालेली विजेची विक्री ध्यानात घेतली, तर त्यात वेगाने वाढ झालेली दिसते.
ई-वाहनांच्या संख्येत वेगाने वाढ
वर्ष आणि वाहनसंख्या
2018 : 4,643
2022 : 1,89,698
31 मार्च 2023 : 2,98,838
ई-बसेसची संख्या
2018 : 4
2022 : 336
मार्च 2023 : 1,399
वाहन आणि इंधन खर्च (प्रति कि.मी.)
प्रकार पेट्रोल विद्युत
दुचाकी 2 रुपये 12 पैसे 0.54 पैसे
चार चाकी 7 रुपये 57 पैसे 1 रुपया 51 पैसे
तीनचाकी 3 रुपये 2 पैसे 0. 59 पैसे
ई-वाहनांचे फायदे
- पेट्रोल किंवा डीझेलवरील वाहनांच्या तुलनेत या वाहनांचा दैनंदिन वाहतूक खर्च व मेंटेनन्स खर्च कमी
- वाहन चालवताना धूर येत नाही. त्यामुळे प्रदूषण शून्य. शिवाय, वाहनांचा आवाज येत नाही.
- घर, ऑफिस यापैकी कोठेही सहजतेने चार्जिंग करता येते.
- ई-कार असल्यास सहज आणि आनंददायी ड्रायव्हिंगचा अनुभव
ई-वाहनांच्या मर्यादा
- किमती सर्वसामान्यांच्या आवाक्यात येणे आवश्यक
- डिस्चार्ज झालेली बॅटरी तातडीने बदलून चार्ज झालेली बॅटरी उपलब्ध होणे आवश्यक
(बॅटरी स्वॅपिंग) - दूरच्या प्रवासावेळी रस्त्यात पुरेशा ठिकाणी चार्जिंगची सुविधा नसणे
- दुचाकीची बॅटरी चार्जिंगसाठी पाच ते सहा तास आणि चारचाकीसाठी आठ ते दहा तास लागतात.





