Maharashtra winter session 2025 | महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन्ही सभागृहांमध्ये म्हणजे विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये अधिकृत विरोधी पक्षनेता नसल्याची परिस्थिती पाहायला मिळत आहे. 288 सदस्यांच्या विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदाचा दावा करण्यासाठी किमान 29 आमदार असणं आवश्यक आहे. परंतु महाविकास आघाडीतील कोणत्याही घटक पक्षाकडे काँग्रेस, ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट स्वतंत्रपणे इतके संख्याबळ नाही. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच नियमांनुसार कोणत्याही विरोधी पक्षाकडे आवश्यक 10 टक्के संख्याबळ नसल्याने हे पद रिक्त राहिले आहे. अधिवेशन ८ ते १४ डिसेंबर होणार राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये ८ डिसेंबरपासून सुरू होत आहे. त्यामुळे कामाला वेगाने सुरूवात झाली असून हे अधिवेशन ८ ते १४ डिसेंबर या दरम्यान होणार आहे. त्यामुळे प्रशासकीय कामाला देखील वेग आला आहे. हिवाळी अधिवेशनाचा कालावधी ८ डिसेंबर ते १४ डिसेंबर असा एकूण सात दिवसांचा असणार आहे. शनिवार आणि रविवार या शासकीय सुट्टीच्या दिवशी देखील दोन्ही सभागृहाचे कामकाज होणार असल्याचा निर्णय विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. Maharashtra winter session 2025 | अधिवेशनाचा कालावधी कमी का? राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे (२१ डिसेंबरपर्यंत) अधिवेशनाचा कालावधी कमी करण्यात आला आहे. अधिवेशनात मुख्यत: विधेयकांची चर्चा, विभागीय आढावे आणि राज्याच्या महत्त्वाच्या समस्या घेतल्या जातील. यंदा विरोधी पक्षनेत्यांचे पद रिक्त असल्यामुळे विरोधक (काँग्रेस, शिवसेना-UBT, NCP-SP) मराठा आरक्षण, शेतकऱ्यांच्या संकट, पीक विमा फसवणूक, मंत्र्यांवरील घोटाळे या प्रश्नांवर विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. Maharashtra winter session 2025 | हेही वाचा: शिरुर तालुक्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट! पोलिस प्रशासनाकडून कारवाई करण्यास टाळटाळ? नेमकं चाललयं तरी काय?