पठ्ठयाने विमानातच घातला गोंधळ.. लंडनला जाणाऱ्या फ्लाईटचे दिल्लीतचं करावे लागले इमर्जन्सी लँडिंग

नवी दिल्ली – एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये एका व्यक्तीने महिला कर्मचाऱ्याशी हुज्जत घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दिल्लीवरून लंडनच्या दिशेने चाललेल्या या विमानात गोंधळ झाल्यामुळे हे विमान पुन्हा दिल्ली विमानतळावर लँड करावे लागले. यानंतर त्या प्रवाश्याला पोलिसांच्या स्वाधीन करून विमानाने लंडनच्या दिशेने पुन्हा कूच केली.
सोमवारी सकाळी हा धक्कादायक प्रकार समोर आला. एका वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे. एअर इंडियाचे फ्लाइट दिल्लीहून सकाळी 6.35 वाजता उड्डाण घेतल्यानंतर काही वेळाने वाद झाला. यानंतर विमानाला पुन्हा दिल्लीला यावे लागले. या विमानात सुमारे 225 प्रवासी होते.या प्रवाशाला इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरवल्यानंतर विमान कंपनीने त्याला विमानतळ पोलिसांच्या ताब्यात दिले. या संपूर्ण प्रकरणाबाबत एअर इंडियाने एक निवेदन जारी केले आहे.
Air India’s London-bound flight returns to Delhi after ‘unruly’ passenger fights with crew
Read @ANI Story | https://t.co/OTKtpLp49j#AirIndia #Delhi #London pic.twitter.com/jyWHqqQJz7
— ANI Digital (@ani_digital) April 10, 2023
काय म्हणटलंय एअर इंडियाच्या निवेदनात नेमकं
एअरलाइनने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “शाब्दिक आणि लेखी इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करूनही, उड्डाण निघताना प्रवाशाने बेशिस्त वागणे सुरूच ठेवले. त्यानंतर वैमानिकाने दिल्लीला परतण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रवाशाला सुरक्षा कर्मचार्यांच्या स्वाधीन केले.या संदर्भात प्रवाशाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
एअर इंडियातील प्रत्येकाची सुरक्षा आणि प्रतिष्ठा आमच्यासाठी महत्त्वाची आहे. सर्वांना सर्वतोपरी मदत करत आहोत. प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत आणि विलंबाबद्दल आम्ही दिलगीर आहोत. आज दुपारी लंडनला जाणार्या फ्लाइटचे वेळापत्रक बदलले आहे.अशी माहिती कंपनीद्वारे देण्यात आली.





