Nagar | मतदार संघातील जनता काँग्रेसबरोबर – आ. कानडे

श्रीरामपूर, (प्रतिनिधी)- विधानसभा मतदारसंघातील श्रीरामपूर तालुका व राहुरी तालुक्यातील 32 गावांत आपण कोट्यवधी रुपयांची विकास कामे केली. काँग्रेस पक्षाचा विचार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले. मतदारसंघातील जनता सुज्ञ असून ती आगामी काळातही काँग्रेस पक्षाच्या विचारधारेबरोबर राहील, असा विश्वास आमदार लहू कानडे यांनी व्यक्त केला.
काँग्रेस बळकटीकरण व आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित विधानसभा मतदारसंघातील बूथ कमिटी, ग्राम काँग्रेस कमिटी पदाधिकारी तसेच मतदारांशी संवाद दौऱ्यात मुठेवडगाव, ,भामाठाण, कमालपूर, घुमनदेव येथे झालेल्या बैठकीत आ. कानडे बोलत होते. काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर, तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक, सतीश बोर्डे, सचिन जगताप या दौऱ्यात त्यांच्यासोबत होते.
कानडे म्हणाले की, आपल्या कार्यकाळात श्रीरामपूरला जोडणारे सर्व रस्ते चौपदरीकरण करून डांबरीकरण केले. नेवासा-बाभळेश्वर रस्त्यासाठी 167 कोटींचा निधी आणला. शेती पाणी व विजेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. श्रीक्षेत्र गोदाधाम सराला बेट या क्षेत्राच्या सर्व बाजूने येणारे रस्ते डांबरीकरण केले. काही रस्त्यांचा दर्जा उन्नत करून त्याला कायमस्वरूपी निधी कसा मिळेल, यासाठी प्रयत्न केला.
यावेळी डॉ. नितीन आसने, बाळासाहेब हुरुळे, धनंजय आसने, संजय खताळ, रवींद्र आसने, प्रमोद दांगट, डॉ.आकाश आसन, केशव आसने, मुठेवाडगावचे सरपंच सागर मुठे, माजी सरपंच भाऊसाहेब मुठे, बाबासाहेब भोंडगे, शिवाजी पवार, जालिंदर मुठे, रंजन चौधरी, सुभाष मुठे, तुकाराम मुठे, सोपान मुठे,
रघुनाथ मुठे, भामाठाणचे सरपंच दिनकर बनसोडे, हरिभाऊ बनसोडे, दिलीप नजन, संदीप बनसोडे, ताहेर शेख, जालिंदर बनसोडे, रवी मुरकुटे, बाळासाहेब दवंगे, किसनराव मुरकुटे, बाबासाहेब पटारे, संजय घोडे, सचिन गाडेकर, रवींद्र शिंदे, प्रवीण दवंगे, अक्षय कांगुणे, विकास गोरे, अमोल दवंगे आदींसह कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते





