Reva Diamonds : लक्झरीला नवी ओळख देणारा रेवा डायमंड्सचा ‘द वन’ उपक्रम
Reva Diamonds : या विशेष निर्मितींचा अनुभव पुण्यातील पौड रोडवरील पुण्याई बिझनेस सेंटर तसेच वाकड येथील फिनिक्स मॉल ऑफ द मिलेनियममधील रेवा डायमंड्सच्या शोरूममध्ये ग्राहकांना घेता येणार आहे.

Reva Diamonds : समकालीन डिझाईन्स आणि उत्कृष्ट कारागिरीसाठी ओळखल्या जाणाऱ्या रेवा डायमंड्सने ‘द वन’ हा विशेष उपक्रम सुरू केला असून, वैयक्तिकत्व, दुर्मिळता आणि कालातीत सौंदर्याला महत्त्व देणाऱ्या ग्राहकांसाठी दर महिन्याला मर्यादित संख्येत विशेष स्टेटमेंट ज्वेलरी सादर केली जाणार आहे.
बदलत्या काळात लक्झरीची संकल्पना केवळ संपन्नतेपुरती मर्यादित न राहता वैयक्तिक अभिव्यक्ती आणि वेगळेपणाशी जोडली जात असल्याचे लक्षात घेऊन हा उपक्रम राबविण्यात आला आहे. ‘द वन’ अंतर्गत सादर होणारी प्रत्येक कलाकृती ही ब्रँडच्या नियमित कलेक्शनपेक्षा वेगळी आणि स्वतंत्र डिझाईन तत्त्वज्ञानावर आधारित असेल.
नैसर्गिक हिऱ्यांची झळाळी, उत्कृष्ट कलात्मकता आणि बारकाईने केलेली कारागिरी यांचा संगम असलेले हे दागिने केवळ अलंकार नसून संग्राह्य कलाकृती म्हणूनही ओळखले जातील. त्यामुळे असामान्य आणि वैशिष्ट्यपूर्ण दागिन्यांची आवड असलेल्या ग्राहकांसाठी हा उपक्रम विशेष आकर्षणाचा ठरणार आहे.
याबाबत बोलताना रेवा डायमंड्सचे संचालक आदित्य मोडक यांनी सांगितले की, आजच्या काळातील लक्झरी म्हणजे अधिक वस्तूंची मालकी नसून खऱ्या अर्थाने अनोखी गोष्ट स्वतःकडे असणे होय. ‘द वन’च्या माध्यमातून वैयक्तिकत्व आणि विशेषत्व साजरे करणारा अनुभव निर्माण करण्याचा प्रयत्न असून, प्रत्येक कलाकृती दुर्मिळ, वेगळी आणि संस्मरणीय ठरेल, यासाठी ती अत्यंत विचारपूर्वक तयार केली जाते.
‘द वन’मधील प्रत्येक आवृत्ती मर्यादित कालावधीसाठी आणि अत्यंत मर्यादित संख्येत उपलब्ध राहणार असल्याने तिचे आकर्षण आणि मूल्य अधिक वाढणार आहे. पुढील अनेक पिढ्यांसाठी जपून ठेवण्याजोगी निर्मिती साकारण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात येत असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
नैसर्गिक हिऱ्यांचे कालातीत आकर्षण आणि आधुनिक डिझाईनचा संगम साधत ‘द वन’ विशेषत्वाचा नवा मापदंड निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. या विशेष निर्मितींचा अनुभव पुण्यातील पौड रोडवरील पुण्याई बिझनेस सेंटर तसेच वाकड येथील फिनिक्स मॉल ऑफ द मिलेनियममधील रेवा डायमंड्सच्या शोरूममध्ये ग्राहकांना घेता येणार आहे.


