अहमदनगर :करोनाबळींची संख्याही दोनशेपार

नगर करोना अपडेट
बरे झालेली रुग्ण संख्या: 12609
उपचार सुरू असलेले रूग्ण : 3072
आजपर्यंतचे मृत्यू : 218
एकूण रूग्ण संख्या : 15899
नगर (प्रतिनिधी) – जिल्हाभरात करोनाचा उद्रेक वाढत असून करोनाने जिल्ह्यात आत्तापर्यंत 218 बळी घेतले आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. दरम्यान, जिल्ह्यात आज 456 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 12 हजार 609 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 79.31 टक्के इतके झाले आहे. काल (गुरुवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत 571 ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 3072 इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 184, अँटीजेन चाचणीत 279 आणि खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 108 रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 134, राहाता 01, पाथर्डी 03, नगर ग्रामीण 32, कॅन्टोन्मेंट 03, नेवासा 02, पारनेर 04, अकोले 01, राहुरी 01, कोपरगाव 01, कर्जत 01 आणि इतर जिल्हा 01 अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आज 279 जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा 44, संगमनेर 26, राहाता 13, पाथर्डी 14, श्रीरामपुर 14, कॅंटोन्मेंट 16, नेवासा 28, श्रीगोंदा 23, पारनेर 14, अकोले 07, राहुरी 22, शेवगाव 07, कोपरगाव 14, जामखेड 31 आणि कर्जत 06 अशा रुग्णांचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या 108 रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा 67, संगमनेर 05, राहाता 03, नगर ग्रामीण 04, श्रीरामपूर 04, कॅंटोन्मेंट 02, नेवासा 04, श्रीगोंदा 02, पारनेर 01,अकोले 05, राहुरी 01, कोपरगांव 02, जामखेड 06 आणि कर्जत 02 अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज 456 रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. मनपा 224, संगमनेर 20, राहाता 13, पाथर्डी 14, नगर ग्रा.23, श्रीरामपूर 09, कॅन्टोन्मेंट 10, नेवासा 28, श्रीगोंदा 20, पारनेर 02, अकोले 14, राहुरी 10, शेवगाव 25, कोपरगाव 08, जामखेड 10, कर्जत 25, मिलिटरी हॉस्पिटल 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.





