उत्तर प्रदेशात तृतीयपंथिचीं संख्या समजणार ; प्रथम राज्य ठरण्याची शक्यता

लखनौ – समाजात कायम उपेक्षित राहिल्या आणि हक्कासांठी लढणाऱ्या तृतीय पंथ्यांसाठी चांगली बातमी आहे. आता त्यांची जनगणना केली जाणार आहे. जेणेकरून त्यांचे भविष्य सुखी करण्यासाठी काही नव्याने उपाय योजना करता येतील. उत्तर प्रदेशातील तृतीयपंथियांची (ट्रान्सजेंडर्स) जनगणना करण्याचा प्रस्ताव राज्याच्या समाजकल्याण विभागाने मांडला आहे. अशा प्रकारची जनगणना करणारे उत्तर प्रदेश हे प्रथम राज्य ठरण्याची शक्यता आहे. तृतीयपंथिय हे समाजाच्या दुर्बल घटकांमधील असून त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि त्यांना सन्मानाने समाजात जगात यावे यासाठी सध्या प्रयन्त सुरु आहेत.
अशी होईल जनगणना
– ही योजना 200 कोटी रुपयांची असेल
– तृतीयपंथियांसाठी शिक्षणाची आणि निवासाची सुविधा देण्यासह
त्यांना अन्य पायाभूत सुविधा देण्याची तरतूद या योजनेत
– साधारणतः 20 लाख तृतीयपंथिय असावेत असे अनुमान
– ‘गरीमा गृहां’चे निर्माणकार्य होणार
ही जनगणना उत्तर प्रदेशच्या सर्व 75 जिल्हय़ांमध्ये होण्याची शक्यता आहे. नुकतीच राज्याच्या तृतीयपंथिय कल्याण मंडळाची बैठक घेण्यात आली होती. त्या बैठकीत ही योजना सादर करण्यात आल्यानंतर मान्यता देण्यात आली होती.





