कोपरगाव तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील लोकांची संख्या शतकी पार !

कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील मोतीनगर भागातील एकाच कुटुंबातील ८ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली तर बाधीत व्यक्तीवर उपचार करणारा एक खाजगी डॉक्टरला त्यांची लागण झाल्याने डॉक्टरांसह इतरांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची संख्या एकट्या सुरेगाव परिसरात ७५ झाली आहे तर करंजी येथील बाधीत रुग्ण व ईतर मिळुन संपर्कातील शतकीपार आकडा झाल्याने स्थानिक प्रशासनाची झोप उडाली आहे.
इतक्या मोठ्या संख्येने संपर्कातील लोकांची कोरोना चाचणी करण्यासाठी वैद्यकीय विभागाने सुरेगाव येथे स्वतंत्र नविन रॅपिड अँटिजन किट अर्थात स्वतंत्र तपासणी यंत्रणा सज्ज केली असुन बाधीत निघालेल्या व्यक्तीवर त्वरीत उपचार करता येणार असुन अति दक्षतेसाठी एखाद्या बाधीत निघालेल्या रुग्णांस अहमदनगर जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात येईल अशी माहीती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.कॄष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.
सध्या कोपरगाव कोव्हीड केअर सेंटर येथे कोरोनाबाधीत ९ रुग्णांवर उपचार चालू असुन सर्वांची प्रकृती व्यवस्थित आहे अशी माहीती विषेश वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडोदे यांनी दिली आहे.
तालुक्यातील कोरोना बाधीतांची साखळी योग्य उपचार करुन तोडण्याचा प्रयत्न करीत असुन नागरीकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाटे व तहसिलदार योगेश चंद्रे यांनी नागरीकांना केले आहेत.
एकाच वेळी 8 कोरोनाबाधित रूग्ण आढळल्याने तालुक्यात आणखी रुग्ण वाढण्याची भिंती प्रशासनाने व्यक्त केल्याने तालुक्यातील जनजीवन विस्कळित होण्याची शक्यता अधिक आहे.





