Sachin Waze Case : NIA पुरावे नष्ट करण्याचे काम करतंय – कॉंग्रेसचा आरोप
Updated On:

मुंबई, दि. 27 – सचिन वाझे प्रकरणात एनआयए म्हणजेच राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून पुरावे नष्ट करण्याचे काम केले जात असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. पक्षाचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी आज पत्रकारांशी बोलताना हा आरोप केला. त्यांनी म्हटले आहे की सचिन वाझे यांचे ऑफिस परमवीरसिंह यांच्या ऑफिसपासून केवळ दोनशे फुटांवर आहे.
त्यामुळे त्यांचा परमवीरसिंह यांच्याशी थेट संबंध येत असे. परंतु एनआयए बॉम्बच्या गाडीच्या प्रकरणात परमवीरसिंह यांची चौकशी करीत नाही. ही चौकशी का टाळली जात आहे असा सवालही त्यांनी उपस्थित केला. या साऱ्या प्रकरणात परमवीरसिंह यांच्या विषयीच संशय निर्माण होत असून एनआयए त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे आणि या संबंधातील पुरावे नष्ट केले जात आहेत असा आरोपही त्यांनी केला.





