Kajal Aggarwal : अभिनेत्री काजल अग्रवाल गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आली आहे. त्याला कारणही तसंच आहे. सोशल मीडियावर काजल अग्रवालची निधन झाल्याची बातमी पसरली होती. या बातमीमुळे चाहत्यांना जबर धक्का बसला होता. मात्र, आता खुद्द काजनेने याबाबत स्पष्टीकरण देत ही बातमी खोटी असून अशा अफवांपासून दूर राहण्याचं आवाहन चाहत्यांना पोस्ट शेअर करत केलं आहे. तसेच अशा खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांना तिने खडेबोल सुनावले आहेत. सोमवारी रात्री काजल अग्रवाल हिचा अपघाती मृत्यू झाली बातमी देण्यात आली होती. यामुळे आता अभिनेत्रीने स्वतः इंन्स्टाग्रामवरून पोस्ट शेअर करत ही बातमी खोटी असून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. तिने इंन्स्टाग्रामवरून शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिच्या मृत्यूची बातमी खोटी असल्याचं सांगितलं आहे. तसेच ती सुरक्षित असल्याचं देखील काजलने सांगितलं आहे. पोस्टमध्ये काय म्हणाली काजल अग्रवाल? मी माझ्या अपघात झाल्याच्या काही खोट्या बातम्या ऐकल्या आहेत. खरे सांगायचे तर, या बातम्या पूर्णपणे खोट्या आहेत. देवाच्या कृपेने मी ठीक आहे. सुरक्षित आहे. मी तुम्हाला विनंती करते की अशा खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका आणि त्या पुढे पसरवू नका. आपण सकारात्मक दृष्टी आणि सत्यावर आपले लक्ष केंद्रित करूया. अभिनेत्री काजल अग्रवाल हिने अनेक साऊथ आणि हिंदी सिनेमात काम केलं आहे. बॅालिवूडमधील सिंघम सिनेमात अभिनेता अजय देवगणसोबत तिने स्क्रिन शेअर केली होती. तेव्हापासून तिला मोठी प्रसिद्ध बॅालिवूड इंडस्ट्रीत मिळाली. रामायण या सिनेमातून काजल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हेही वाचा : Birthday Special: शाली विकणारा तरुण ते करोडोच्या साम्राज्याचा मालक: जाणून घ्या राज कुंद्राचा प्रवास…