पुणे -“कोण होणार करोडपती’चे नवे पर्व येत्या 29 मे पासून सोमवार ते शनिवार रात्री नऊ वाजता सोनी मराठी वाहिनीवर सुरू होत आहे. यंदा बक्षिसाची रक्कम दुप्पट म्हणजे दोन कोटी रुपये करण्यात आली आहे. या पर्वात सहभागी होण्यासाठी मिस कॉल करणे आवश्यक होते. यासाठी देण्यात आलेल्या क्रमांकावर यावेळी तब्बल 14 लाख लोकांनी मिस काल देत या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे, अशी माहिती सोनी मराठीचे बिजनेस हेड अजय भाळवणकर यांनी दिली.
आता मागे नाही राहायचे आपल्या माणसाला जिंकताना बघायचे, अशी या पर्वाची टॅग लाइन आहे. पण, एक पाऊल तसेच पुढे टाकताना आपण एक पाऊल मागे जात असतो. त्यामुळे आता मागे नाही राहायचे मला नेहमी वाटते की, सामान्य ज्ञानाचा अभ्यास कसा करणार? स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे अनेक स्पर्धक या खेळात येतात. पण स्पर्धा परीक्षांची तयारी म्हणजे सगळी तयारी नाही. कारण सर्वच स्पर्धक अभ्यास करून आलेले असतात. पण, हॉट सीटवर बसल्यावर काही सुचतच नाही, अशा वेळी स्पर्धकांना रिलॅक्सिंग वातावरण तयार करून देणे ही मोठी जबाबदारी असते माझ्यावर, असे “कौन बनेगा करोडपती’चे सूत्रसंचालक अभिनेते सचिन खेडेकर यांनी सांगितले.
200 स्पर्धकांची निवड
कौन बनेगा करोडपती या पर्वाची वैशिष्ट्ये म्हणजे यंदा बक्षिसाची रक्कम दुप्पट म्हणजे दोन कोटी रुपये करण्यात आली आहे. शिवाय यंदा 15 ऐवजी 16 प्रश्नांचा खेळ असणार आहे. 14 लाख कॉल्समधून 200 स्पर्धकांची निवड या पर्वासाठी करण्यात आली आहे, असे भाळवणकर यांनी सांगितले.