जिल्हा परिषदेचे नवे सीईओ अखेर दीड महिन्यानंतर हजर

नगर – अविश्‍वास ठरावामुळे बदली झालेले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजित माने यांच्या जागी 7 ऑगस्टला बदलीची ऑडर झालेले एस.एस. पाटील यांनी 44 दिवसानंतर गुरूवारी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. पाटील मुंबईला सीडकोत कार्यरत होते. त्याठिकाणी असणाऱ्या सर्व जबाबदाऱ्या पूर्ण केल्यावर ते गुरूवारी नगर जिल्हा परिषदेत रुजू झाले. त्यांचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर आणि अन्य अधिकाऱ्यांनी स्वागत केले.

मुळचे कोल्हापूर जिल्ह्यातील असणारे पाटील हे सध्या सीडको या ठिकाणी मुंबईत कार्यरत होते. पंतप्रधान आवास योजनेची महत्वाची जाबदारी पाटील यांच्या खांद्यावर होती. ती पूर्ण केल्यावर त्यांना बुधवारी (दि.18) ला कार्यमुक्त करण्यात आले होते. पाटील यांचे वडील कर्जत तालुक्‍यातील मिरजगाव या ठिकाणी जिल्हा परिषद सेवेत होते. त्यामुळे त्यांचे शिक्षण त्या ठिकाणी झाले.पुढील शिक्षण महात्मा फुले विद्यापीठात झालेले आहे.

पाटील यांनी आतापर्यंत मंत्रालयस्तरावरच काम केले असून जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी पदावर काम करण्याचा त्यांचा पहिलाच अनुभव आहे. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी माने यांच्यावरील अविश्‍वास ठराव यामुळे प्रशासन आणि पदाधिकारी- सदस्य यांच्यात निर्माण झालेली दरी कमी झाली होती. गुरूवारी दुपारी मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांनी प्रभारी भोर यांच्याकडून पदाची सुत्रे स्वीकारली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके डॉ सुनिल तुंबारे मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्रीकांत अनारसे कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)