नेपाळमध्ये प्रवासी वाहतुक करणारी जीप नदीत कोसळली
Updated On:
काठमांडू (नेपाळ)- येथील हुमाला जिल्ह्यातील पहाडी भागातील एका गावातून जिल्ह्याच्या ठिकाणी प्रवासी घेवून जाणारी जीप कर्नाळी नदीत कोसळून झालेल्या अपघातात जीप मधील 15 प्रवासी बेपत्ता असल्याची माहिती स्थानीक वृत्तपत्र हिमालयन टाईम्सने दिले आहे.
येथील खर्पुनाथ गावातील लोक जीपने जिल्ह्याच्या ठिकाणी जात असताना दुपारी 1 वाजताच्या दरम्यान हा अपघात घडला. सदर जीप मध्ये 9 प्रवासी वाहतुक करण्याची क्षमता असताना या गाडीत 15 प्रवासी प्रवास करत होते.
या प्रवाशांना वाचविण्यासाठी शोध मोहिम हाती घेतली असुन त्यासाठी नेपाळ पोलिस आणि आर्मीने शोध पथक स्थापन केले आहे. मात्र, अद्याप या शोधपथकाला यश मिळालेले नाही.
टॅग्स:





