आयटी क्षेत्रात वेगात कौशल्य वाढविण्याची गरज
Updated On:

बंगळुरू – माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आज घेतलेले कौशल्य दोन-तीन वर्षांत निरुपयोगी ठरते. त्यामुळे तरुणांना वेगात कौशल्य आत्मसात करण्याची गरज असल्याचे नॅसकॉमचे अरमन यू. बी. प्रवीण राव यांनी सांगितले.
अशी कौशल्ये आत्मसात करण्यासाठी ऑनलाइन अभ्यासक्रमाचा जास्त उपयोग होणार आहे. आज घेतलेले ज्ञान लवकरच निरुपयोगी ठरते ते विसरून जाऊन नवीन ज्ञान स्वीकारले तरच आपण कालबाह्य होत नाही, असे त्यांनी या विषयात पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले.





