पुणे | मातंग समाज एकत्र येणे काळाची गरज

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – समाजाने एकत्र येणे काळाची गरज असून सर्वांनी एकत्र यावे. असे आवाहन माजी राज्यमंत्री रमेश बागेवे यांनी केले, सहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृती दिना निमित्ताने मातंग एकता आंदोलनाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
दिग्दर्शक भाऊसाहेब कऱ्हाडे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अविनाश सांगोलेकर, माजी नगरसेवक अविनाश बागवे, अंकल सोनवणे, विठ्ठल थोरात, सुरेखा खंडगळे, अरुण गायकवाड आदि उपस्थित होते. कार्यक्रमास मातंग समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.
ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ.अविनाश सांगोलेकर यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यावर आधारित व्याख्यान दिले. यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या फकिरा कांदबरीवर आधारीत चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असल्याचे घोषणा कऱ्हाडे यांनी केली.
काँग्रेस भवन येथे अभिवादन…
साहित्यरत्न लोकशाहिर अण्णा भाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रभारी अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी काँग्रेस भवन येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी माजी नगरसेविका लता राजगुरू, अजित दरेकर, संगीता तिवारी, रजिया बल्लारी, शोभना पण्णीकर, सुंदरा ओव्हाळ, सुनिता नेमुर, उषा राजगुरू, विशाल जाधव, राजू ठोंबरे आदींसह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
विचारांवर महाचर्चा…
झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीने साहित्यरत्न, लोकशाहिर अण्णा भाऊ साठे यांचे भारतीय साहित्यातील अण्णा भाऊंचे क्रांतीकारक योगदान, या विषयावर महाचर्चा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस होते. तर प्रमुख वक्ते थोर विचारवंत, साहित्यीक विश्वासराव पाटील, विशेष आतिथी रविप्रकाश कुलकर्णी, प्रमुख अतिथी म्हणून आचार्य. रतनलाल सोनाग्रा होते. स्वागताध्यक्ष भगवानराव वैराट होते.





