सर्वांनी एकत्र येऊन शिवसृष्टीला हातभार लावण्याची गरज- उदयनराजे
Updated On:
पुणे- साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज शिवशाहीर बाबासाहेब पुंरदरे यांची पुण्यात भेटली घेतली आहे. यावेळी उदयनराजेंनी पुण्यातील कात्रज परिसरात तयार होत असलेल्या “शिवसृष्टी”ची देखील पाहणी केली. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यात शिवसृष्टीचं काम सध्या सुरु आहे.
दरम्यान, यावेळी उदयनराजेंनी बाबासाहेब पुरंदरे यांच्या बद्दल आपले विचार देखील मांडले. या शिवसृष्टीला सरकार मदत करत आहे. पण सर्वांनी एकत्र येऊन या शिवसृष्टीला हातभार लावण्याची गरज आहे. असं मत उदयनराजेंनी व्यक्त केलं.
टॅग्स:





