‘बॅड बॅंके’ची आवश्यकता वाढली
Updated On:

नवी दिल्ली – बॅंकांचे एनपीए वाढत असल्यामुळे बॅड बॅंकेची आवश्यकता वाढली आहे. किंबहुना बॅड बॅंक निर्माण करणे अपरिहार्य झाले आहे, असे रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर सुब्बाराव यांनी म्हटले आहे.
अनुत्पादक मालमत्तेचे बरेच प्रश्न नादारी आणि दिवाळखोरी संहितेच्या चौकटीबाहेर सोडवावे लागणार आहेत. यासाठी 2017 च्या आर्थिक सर्वेक्षणातही बॅड बॅंकेची स्थापना करण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले होते. यात अनुत्पादक मालमत्ता विकण्याची यंत्रणा विकसित केली जाणार असल्यामुळे भ्रष्टाचाराला कमी वाव आहे, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.





