Supriya Sule : ‘राष्ट्रवादी कालही शरद पवारांचाच होता, आजही आहे आणि उद्याही राहील’; सुप्रिया सुळेंचं सर्वात मोठं वक्तव्य
Supriya Sule : सिब्बल यांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालावर आक्षेप नोंदवला आहे. याचदरम्यान शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठं वक्तव्य केले आहे.

Supriya Sule : सध्या शिवसेना पक्ष आणि चिन्ह याबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. सुनावणीत दोन्ही बाजूंकडून युक्तिवाद केला जात असून, उबाठा गटाचे वकिल कपिल सिब्बल जोरदार व्यक्तिवाद करत आहेत. ते अनेक मुद्यांवर कोर्टाचे लक्ष वेधून घेत आहेत. सिब्बल यांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालावर आक्षेप नोंदवला आहे. याचदरम्यान शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठं वक्तव्य केले आहे.
“मी राष्ट्रवादी पक्ष हा फक्त शरद पवार यांच्यासाठी मागतेय. शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे फाउंडर मेंबर आहेत. राष्ट्रवादीचं जे संविधान आहे, त्यामध्ये आमदार आणि खासदार याचं मतदान नाही. पक्ष ज्याचा आहे, त्यांच्याकडेच राहील, अशी तरदूत त्यात आहे. राष्ट्रवादी पक्ष हा देखील शरद पवार यांचा कालही होता, आजही होता आणि उद्याही आहे.” असे वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केले आहे. त्या पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
पुढे त्या म्हणाल्या, “या प्रकरणात आम्ही सर्व पुरावे न्यायालयात सादर केलेत. पण निवडणूक आयोगाने आमच्यावर अन्याय केला हे मी जड अंतकरणाने सांगतेय. कारण आम्हाला अशा संस्थावर टीका करायला आवडत नाही. पण दुर्दैवाने निवडणूक आयोगाने अतिशय चुकीच्या पद्धतीने राष्ट्रवादी पक्षावर अन्याय केला असे त्या म्हणाल्या. तसेच शिवसेनेची सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु असताना आम्ही अनेक वेळा राष्ट्रवादीच्या याचिकेसाठीही तारीख मागितली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांच्या याचिकेवर एकत्र घेण्यात यावी, अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली.
शिवसेना ही उद्धव ठाकरेंचीच : सुप्रिया सुळे
शिवसेना पक्ष आणि चिन्ह यावर उबाठागट आणि शिंदेसेनेच्या नेत्यांकडून आरोप प्रत्यारोप केले जात आहे. दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी याविषयी भाष्य़ करत अनेक दावे देखील केले आहेत. यावर सुप्रिया सुळेंनी महत्वाची प्रतिक्रिया दिली. “शिवसेना पक्षाची स्थापना बाळासाहेब ठाकरेंनी केली. त्यांच्या हयात त्यांनी या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरेंकडे सोपवली. त्यामुळे शिवसेना ही उद्धव ठाकरे यांचीच आहे.” असे त्या म्हणाल्या आहेत.






