पुणे | महापालिका आयुक्तही तापाने फणफणले

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – वातावरणातील बदल आणि पावसामुळे शहरात डेंग्यू, झिका, चिकूनगुनियाचे वाढत आहेत. त्यातच डेंग्यूसदृश्य लक्षणांमुळे पुणे मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांना खासगी रुग्णालयात दाखल झाले आहेत.
लक्षणांनुसार आयुक्तांच्या वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या आहेत. त्यांचा डेंग्यूबाबतच्या तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. मात्र, मनपा आरोग्य विभागाने तातडीने पावले उचलत खबरदारीचा उपाय म्हणून आयुक्त निवासस्थान परिसरात औषध फवारणी सुरू केली आहे.
शहरात वातावरणातील बदलामुळे गेल्या काही महिन्यांपासून तापाचे रुग्ण वाढत आहेत. त्यातत अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचत असल्याने डासांच्या अळ्या वाढतात.
त्यात मोठ्या प्रमाणावर डासांची उत्पत्ती होते. परिणामी, डास चावून त्यामुळे होणाऱ्या रोगांचे प्रमाणही वाढलेले आहे. हे रुग्ण वाढत असतानाचा आता महापालिका आयुक्तांनाच डेंगीसदृश्य लक्षणे आढळल्याने रुग्णालयात दाखल करावे लागले आहे.





