‘एमएचटी-सीईटी’ ठरल्याप्रमाणेच होणार

पुणे – अभियांत्रिकी, फार्मसी आणि कृषी पदवी प्रथम वर्ष अभ्यासक्रमांसाठी अनिवार्य असलेली “एमएचटी-सीईटी’ परीक्षा जुलै महिन्यात होणार असून, त्याबाबतचे वेळापत्रक यापूर्वीच जाहीर केले. या परीक्षांच्या तारखेत आता कोणताही बदल नसून, जाहीर केलेल्या तारखेतच परीक्षा होणार असल्याचे आज राज्य सीईटी सेलने स्पष्ट केले.
राज्य सीईटी सेलमार्फत “एमएचटी-सीईटी’ परीक्षा घेतली जाते. ही सीईटी दि.4 जुलै ते 5 ऑगस्ट दरम्यान होणार असल्याचे राज्य सीईटी सेलने 19 मे रोजी जाहीर केले होते. त्यानंतर आज राज्य सीईटी सेलने या परीक्षांच्या तारखेत कोणताही बदल नाही, असे परिपत्रकाद्वारे सांगितले आहे. “पीसीएम’ आणि “पीसीबी’ या ग्रुपचे परीक्षाचे वेळापत्रक जूनच्या मध्यापर्यंत जाहीर केले जाणार आहे. दरम्यान, या सीईटीसाठी अर्ज करण्यासाठी पुन्हा एकदा लिंक खुली करण्यात आली आहे. त्याची शेवटची मुदत 1 जूनपर्यंत आहेत.





