Election News – भाजप आणि शिवसेनेने ठाणे महापालिकेत स्वबळाचा नारा दिला आहे. ठाणे महानगर पालिकेत महायुतीत विसंवादी सूर निर्माण झाला आहे. आनंद आश्रम इथे नरेश म्हस्केंच्या उपस्थितीत शिवसेनेची बैठक झाली. या बैठकीत ठाणे मनपा स्वबळावर लढवण्याची मागणी शिवसेना नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी केली आहे. तर, आता ठाण्यात पार पडलेल्या भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या बैठकीतही अबकी बार ७० पारचा नारा दिला आहे. तसेच महापौर भाजपचाच होणार, अशी भूमिका भाजपच्या उपस्थित पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. शिवसेना करत असलेल्या विकासकामांत भाजप पदाधिकाऱ्यांचे अडथळे येत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. दुसरीकडे ठाण्यात भाजपनेही स्वबळाची तयारी सुरू केली आहे.