कंपनीच्या मॅनेजरने महिलेस शिविगाळ करुन केला ‘अत्याचार’ पोलिसांत FIR दाखल

शिरूर । येथे एका महिलेला शिवीगाळ करत अत्याचार करण्याची धमकी देण्याची घटना घडली आहे. या गुन्हेगाराचे नाव श्रीकांत साहू असून गेल्या महिन्याभरापासून हा व्यक्ती महिलेस त्रास देत असल्याची माहिती समोर येत आहे.
या घटनेबाबत स्थानिक पोलिसांना कळताच पोलिसांनी श्रीकांत साहू याच्यावर तक्रार दाखल केली आहे. याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सविस्तर माहितीनुसार, श्रीकांत साहु याने मागील दोन महिन्यापासून करडे येथील एका महिलेकडे वाईट नजरेने पाहुन शिवीगाळ केली. १७ सप्टेबरला रात्री १० वाजण्याच्या सुमारास महिलेच्या घरासमोर जाऊन श्रीकांत साहू याने महिलेस शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
तसेच तिच्या घरमोरील परिसरात साहूचे घर असून श्रीकांत साहु हा घरासमोरील गॅलरीमधून त्यांच्याकडे वाईट नजरेने पाहुन मोठ मोठ्याने अश्लील घाण भाषेत शिवीगाळ करत असे. यावर महिलेने त्याला पोलिसात तक्रार करील असे म्हणताच त्याने माझे कोणीच काही करून शकत नाही मी मॅनेजर आहे . असं म्हणत तिला दमदाटी केली.
अशात पोलिसांना परिसरातील काही लोकांनी सांगत पोलिसांनी वेळेत या घटनेची दाखल घेतली. आणि गुन्हा दाखल केला. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जाधव हे करत आहे.





