‘टॅाक्सिक’च्या निर्मात्यांनी घेतला मोठा निर्णय; हे कारण देत सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली, यशच्या चाहत्यांचा हिरमोड…

Toxic movie | केजीएफ फेम अभिनेता यश याचा टॅाक्सिक सिनेमाला घेऊन चाहते प्रचंड उत्सुक आहेत. गेल्या काही दिवसात या सिनेमाचे वेगवेगळे पोस्टर्स आणि टीझर रिलीज करण्यात आले होते. यानंतर सिनेमाची रिलीज डेटही जाहीर करण्यात आली होती. पण आती टॅाक्सिकची रिलीज डेट निर्मात्यांनी पुढे ढकलली आहे. यासंबंधतीची माहिती सांगणारे पोस्टर सिनेमाच्या टीमने त्यांच्या एक्स अकाउंटवरून शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये टॅाक्सिक 19 मार्च 2026 रोजी प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले आहे. यामुळे यशच्या चाहतांचा चांगलाच हिरमोड झाला आहे.
सुरुवातीला या सिनेमाची रिलीज डेट 10 एप्रिल 2025 असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, सिनेमाचे शूटिंग अजूनही सुरू आहे. त्यामुळे हा सिनेमा आता पुढच्या वर्षीच प्रदर्शित होणार आहे. यश त्याच्या आगामी ‘टॉक्सिक’ सिनेमावर प्रचंड मेहनत घेत सिनेमावर काम करत आहे. यश नेहमीच त्याच्या चाहत्यांना सिनेमाच्या सेटवरून अपडेट्सही देत असतो. या सिनेमाचे 1000 क्रू मेंबर्ससोबत शूटिंग होत आहे, अशी बातमी सुरुवातीला समोर आली होती. त्यानंतर बातमी आली की निर्मात्यांनी बेंगळुरूमध्ये 20 एकर जागेवर सिनेमाचा सेट तयार केला असून सिनेमाचे काम सुरू होणार आहे. दरम्यान, यशने त्याची नवीन रिलीज डेट जाहीर केली आहे.
A Fairy Tale for Grown-Ups… Toxic takes over on 19-03-2026 ⚡#ToxicTheMovie#TOXIC @TheNameIsYash #GeetuMohandas @KVNProductions #MonsterMindCreations @Toxic_themovie pic.twitter.com/q597ASCLBq
— TOXIC (@Toxic_themovie) March 22, 2025
गीतू मोहनदास दिग्दर्शित ‘टॉक्सिक’ एकाच वेळी कन्नड आणि इंग्रजी भाषेत शूट होत आहे. त्यानंतर हा सिनेमा हिंदी, मल्याळम, तमिळ आणि तेलगूमध्येही डब केला जाणार आहे. हा सिनेमा मोठ्या स्केलवर तयार करण्यात आला असून यासाठी निर्मात्यांनी कोणतीही कसर सोडलेली नाही. मार्च 2026 प्रदर्शित होणाऱ्या मोठ्या सिनेमांमध्ये ‘टॉक्सिक’ हे एकमेव नाव नाही, तर त्यावेळी संजय लीला भन्साळी यांचा ‘लव्ह अँड वॉर’ हा सिनेमाही प्रदर्शित होणार आहे.





