‘बाटला हाऊस’ची बॉक्स ऑफिसवर जादू
Updated On:

बॉलीवूड अभिनेता जॉन अब्राहम याच्या “बाटला हाऊस’ हा चित्रपट 15 ऑगस्ट 2019 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाने ट्रेलर लाँच होताच काही मिनिटांतच त्याला लाखो ह्यूज मिळाले होते. तर चित्रपट प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केली आहे.
‘बाटला हाऊस’ या चित्रपटाने रिलीजच्या दुसऱ्या दिवशी तब्ब्ल 21 कोटींचा गल्ला जमवला आहे. येत्या कालावधीत हा चित्रपट आणखी विक्रम प्रस्थापित करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, हा चित्रपट 2008मध्ये दिल्लीतील बाटला हाउसमध्ये झालेल्या सत्य घटनेवर आधारित आहे. या टिझरमध्ये त्याची या चित्रपटात जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत दिसत आहे.





