Mumbai Municipal Corporation Election : राज्यातील २९ महापालिका निवडणुकीत प्रचाराचा धुरळा उडाला असून, लवकरच बड्या नेत्यांच्या सभा उमेदवारांच्या प्रचारासाठी होणार आहेत. वरिष्ठ नेत्यांपासून स्थानिक कार्यकर्त्यांपर्यंत सर्वच राजकीय पक्षांची टीम कामाला लागली आहे. या सगळ्यात अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष मुंबई महापालिका निवडणुकीकडे लागलेले आहे. जशी जशी निवडणूक जवळ येत आहे. तशा अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि इतरही पक्षांमध्ये निष्ठावानांना उमेदवारी डावल्याचा आरोप होत असून यामुळे मोठा उद्रेक पाहायला मिळाला होता. आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील तीन निष्ठावंत शाखाप्रमुखांनी ऐन मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. निष्ठावंतना डावलून आयातांना उमेदवार दिल्याने त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. मुंबईतील चांदिवली विधानसभतील उद्धव सेनेच्या तीन शाखाप्रमुखांनी राजीनामे दिले आहेत. प्रभाक क्रमांक १६०, १५९ आणि १५७ या प्रभागातील शाखाप्रमुखांनी राजीनामे दिले आहेत. उमांकात भांगिरे, प्रशांत नलगे, बाळकृष्ण गटे यांनी उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र केला आहे. ऐन निवडणुकीच्या काळात तीन शाखाप्रमुखांनी राजीनामा दिल्याने चांदिवली विधानसभा क्षेत्रात ठाकरेंसाठी ही धक्का देणारी बाब म्हटली जात आहे. यासंदर्भात उमांकात भांगिरे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. प्रभाग क्रमांक १६१ मध्ये पैशांसाठी मराठी बहुल विभागात मागच्या वेळी एमआयएमममधून निवडणूक लढविलेल्या मुस्लिम उमेदवाराला उमेदवारी दिल्याने राजीनामा देत असल्याचे सांगितले. संतप्त प्रतिक्रिया चांदिवली विधानसभेत निष्ठा विकली गेली, मी देखील पक्षाचा उमेदवारी अर्ज भरला होता. पण स्थानिक विभाग प्रमुखाने जो शिवसैनिकही नाही अशा बाहेरून आलेल्याला उमेदवारी दिली. मराठी माणसांची निष्ठा तुटपुंज्या पैशांसाठी विकली गेली, अशी संतप्त प्रतिक्रिया उमांकात भांगिरे यांनी दिली आहे. हेही वाचा : “पिक्चर अभी बाकी है”; असे म्हणत लक्ष्मण हाकेंनी कुणाला दिला इशारा? पूजा जाधव यांच्याविषयी म्हणाले…