पहिल्या महिला आयपीएस अधिकारी किरण बेदींचा जीवनप्रवास उलगडणार रुपेरी पडद्यावर

Kiran Bedi Biopic | देशातील पहिल्या महिला आयपीएस अधिकारी किरण बेदी यांच्या बायोपिकची घोषणा करण्यात आली आहे. किरण बेदी यांचा जीवनपट रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. या बायोपिकला ‘बेदी’ असं नाव देण्यात आलं आहे. हा चित्रपट २०२५ मध्ये प्रदर्शित होणार आहे. निडर, प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळख असणाऱ्या किरण बेदी यांचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर उलगडणार आहे.
‘बेदी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन कुशाल चावला करणार आहेत. या चित्रपटातील स्टारकास्ट बाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. या सिनेमामध्ये प्रेक्षकांना किरण बेदी यांच्या कधीही न ऐकलेल्या गोष्टींचा उलगडा होणार असल्याचे निर्मात्यांनी म्हटले आहे.
View this post on Instagram
किरण बेदींचा जीवनप्रवास
1972 मध्ये त्या आयपीएस अधिकारी झालेल्या त्या देशातील पहिली महिला आयपीएस अधिकारी म्हणून त्यांना ओळखले जाते. जवळपास 35 वर्ष भारतीय पोलीस दलात सेवा बजावल्यानंतर 2007 मध्ये निवृत्ती घेतली. निवृत्तीच्या वेळी त्या ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंटच्या महासंचालकपदी कार्यरत होत्या. Kiran Bedi Biopic |
किरण बेदी यांनी दिल्लीव्यतिरिक्त गोवा, चंदीगड आणि मिझोराममध्ये आयपीएस अधिकारी म्हणून काम केले आहे. अमृतसरमध्ये 9 जून 1949 रोजी जन्मलेल्या किरण बेदी यांनी ड्रग्जच्या विरोधात मोहीम चालवली होती. तिहार तुरुंगाला मॉडेल जेल बनवण्यात त्यांचे योगदान होते. 1994 मध्ये आशिया खंडाचा नोबेल पुरस्कार समजल्या जाणाऱ्या मॅगसेसे पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला. याशिवाय त्या राजकारणात देखील सक्रिय आहेत. Kiran Bedi Biopic |
हेही वाचा :
अजित पवार गटाकडून राज्यसभेसाठी कोणाची लागणार वर्णी? सुनेत्रा पवारांसह ‘ही’ नावे चर्चेत





