अजित पवार गटाकडून राज्यसभेसाठी कोणाची लागणार वर्णी? सुनेत्रा पवारांसह ‘ही’ नावे चर्चेत

Rajya Sabha Election 2024| अजित पवार गटाचे नेते अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. या जागेवर अर्ज भरण्यासाठी केवळ एक दिवस बाकी आहे. असे असताना अद्याप अजित पवार गटाकडून कोणत्याही उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र गुरुवार शेवटचा दिवस असल्याने आज राष्ट्रवादीच्या उमेदवारीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सुनेत्रा पवार
यासाठी राष्ट्रवादीत सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा सुरू असल्याचे समोर आले आहे. यंदाच्या बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार यांना सुप्रिया सुळे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी आग्रह धरला होता. पुणे शहर आणि जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या वाढीसाठी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर संधी देऊन त्यांना केंद्रीय राज्यमंत्रिपद द्यावे, अशी मागणी अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती.
पार्थ पवार, छगन भुजबळ
पार्थ पवार यांनी देखील कुटुंबातील सदस्य खासदार व्हावा, यासाठी मंगळवारी प्रफुल पटेल आणि सुनिल तटकरे यांची भेट घेतली होती. पार्थ पवार हे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठीही इच्छूक असल्याची चर्चा होती. मात्र, तेव्हा संधी न मिळाल्याने त्यांना आता राज्यसभेसाठी संधी मिळणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तर दुसरीकडे छगन भुजबळ यांचे नाव देखील चर्चेत आहे. उद्या दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. त्यामुळे येत्या काही तासांमध्ये उमेदवारीचा हा सस्पेन्स संपू शकतो. Rajya Sabha Election 2024|
शरद पवार गटाने प्रफुल पटेलांना विरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली होती. परंतु प्रफुल पटेल यांनी राज्यसभेचा मार्ग स्विकारला होता. त्यामुळे अपात्रतेच्या कारवाईतून त्यांची मुक्तता झाली. त्यामुळे राज्यसभेची जागा रिक्त झाली आहे. या जागेसाठी आता २५ जून रोजी यानिवडणूक होणार आहे. Rajya Sabha Election 2024|
राष्ट्रवादीने ‘ही’ मागणी केली होती
राष्ट्रवादीने आपले राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांना कॅबिनेट मंत्री करण्याची मागणी केली होती. रविवारी नरेंद्र मोदी सरकारमध्ये त्यांना स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता, मात्र राष्ट्रवादीने हा प्रस्ताव नाकारत कॅबिनेट मंत्रिपदाचा पुनरुच्चार केला.
हेही वाचा :





