‘अजित पवार हे स्वत: बारामतीत पराभूत होणार’ ‘या’ नेत्याच्या विधानामुळे राजकारण तापलं

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून देखील जनसन्मान यात्रा काढण्यात आली आहे. विरोधक महायुतीच्या नेत्यांवर निशाणा साधत आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी राज्य सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेतंर्गत महिलांना दर महिना १५०० रुपये दिले जाणार आहेत. या योजनेवरून महाविकास आघाडीच्या नेते यावरून टीका करत आहे.
अशात आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी,’आम्हाला पाठबळ द्या, माझी लाडकी बहीण योजना अखंडपणे सुरू राहील. हा दादाचा वादा आहे, असे वक्तव्य केले. त्यावरुन आता शिवसेनेच्या खासदाराने टीका केली आहे.
संजय राऊत नेमकं काय म्हणाले…
‘अजित पवार हे स्वत: बारामतीत पराभूत होणार आहे. बारामतीच्या सर्व लाडक्या बहिणी त्यांना पराभूत करणार आहे. महाराष्ट्रात सर्व गद्दार आमदार पुन्हा विधानसभेत दिसणार नाहीत. लाडक्या बहिणीच त्यांचा पराभव करतील’ असे दावा त्यांनी केला आहे
ते पुढे म्हणाले,’लाडकी बहिण योजना ही चांगल्या हेतूने आणलेली नाही. फक्त महिलांची मतं मिळावीत, या हेतूने ही योजना आणलेली आहे. अजित पवार हे स्वत: बारामतीत पराभूत होणार आहेत. बारामतीच्या सर्व लाडक्या बहिणी या त्यांना पराभूत करणार आहेत. महाराष्ट्रात सर्व गद्दार आमदार पुन्हा विधानसभेत दिसणार नाहीत. लाडक्या बहिणीच त्यांचा पराभव करतील. लाडक्या बहिणी या इतक्या लाचार नाहीत. हे सर्व बोलणारे सरकारी लोचक मजनू आहेत. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका’ असेही आवाहनही राऊत यांनी केले.





