Adani Group : अमेरिकेतील खटल्याचा परिणाम नाही, विस्तारीकरणासाठी पुरेसे भांडवल उपलब्ध – अदानी समूह

नवी दिल्ली – अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील न्यायालयात अदानी समूहातील महत्त्वाच्या व्यक्ती विरोधात भ्रष्टाचाराचा खटला दाखल करण्यात आला आहे. या खटल्याचा अदानी समूहाच्या विस्तारीकरणावर किंवा कर्ज परतफेडीवर कसलाही परिणाम होणार नाही. यासाठी पुरेसे भांडवल आणि इतर स्त्रोत समूहाकडे उपलब्ध असल्याचे या समूहाने स्पष्ट केले.
या समूहाचे अधिकार्यांनी सांगितले की, सध्या कंपनीकडे 55,024 कोटी रुपये उपलब्ध आहेत. पुढील 28 महिने विस्तारीकरण आणि कर्जाच्या परतफेडीसाठी ही रक्कम पुरेशी आहे. गेल्या सहा महिन्यात या समूहाने 75,227 कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक केली आहे. तर केवळ 16,882 कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. ही माहिती कंपनीच्या गुंतवणूकदारांना उपलब्ध करण्यात आले आहे. समुहाने असे म्हटले आहे की, कंपनीकडे उपलब्ध असलेले 55,024 कोटी रुपये कंपनीच्या कर्जाच्या 21% आहेत. हे प्रमाण संतुलित आहे.
या अगोदरच कंपनीने पुढील दहा वर्षात 100 अब्ज डॉलरची म्हणजे आठ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना जाहीर केली आहे. गेल्या पाच वर्षात कंपनीचा महसूल प्रतिवर्ष 30 टक्क्यांनी वाढत आहे. याचा अर्थ कर्ज जरी घेतले नाही तरी कंपनीला पुढील दहा वर्षात 5.9 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करता येऊ शकणार आह. गेल्या बारा महिन्यांमध्ये समुहाचा करपुर्व नफा 17 टक्क्यांनी वाढवून 83,440 कोटी रुपयांवर गेला आहे. त्यामुळे कंपनी पुढील तीन वर्षात सर्व कर्जाची परतफेड सहज करू शकेल.
अदानी समुहानेे भारतातील बँकांकडून दीर्घ पल्ल्याचे 94,400 कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. तर याच बँकात आगामी समूहाची 53,054 कोटी रुपयांची रक्कम शिल्लक आहे. अदानी समूहाने घेतलेल्या एकूण कर्जापैकी परदेशी बँकांकडून घेतलेल्या कर्जाची रक्कम 27% आहे.
CREDAI : किफायतशीर घराची व्याख्या बदलावी, विकासकांच्या क्रेडाई संघटनेची केंद्र सरकारकडे मागणी
अदानी समूहातील प्रमुख व्यक्तीवर अमेरिकेतील न्यायालयात खटला दाखल करण्यात आलेला आहे. त्यामुळे या समूहाला आता अमेरिकेतील गुंतवणूकदाराकडून किंवा इतर जागतिक गुंतवणूकदाराकडून गुंतवणूक आकर्षित करणे अवघड जाणार आहे असे समजले जात आहे. या पार्श्वभूमीवर अदानी समूहाने आपल्या सध्याच्या गुंतवणूकदारांना आपल्या कंपनीची माहिती कळविली आहे. काही पतमानांकन करणार्या संस्थांनी अदानी समूहाबद्दल फेरविचार करण्याची शक्यता सूचत केली आहे तर अदानी समूहाच्या कर्जरोख्यावरील परतावा काही प्रमाणात कमी झाला आहे.





