Shivajiraje Bhosale again : ‘मी शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटाने अख्या महाराष्ट्राला वेड लावले होते. २००९ मध्ये आलेल्या या चित्रपटाने मोठा इतिहास रचला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले होते. चित्रपटात अभिनेते सचिन खेडेकर हे शिवरायांच्या भूमिकेत होते आता पुन्हा शिवाजीराजे भोसले चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून, लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची रिलीज डेट समोर आली असून टीझर रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटाची घोषणा महाराष्ट्र दिन म्हणजेच १ मे रोजी करण्यात आली होती. त्यानंतर चित्रपट कधी रिलीज होणार असे विचारले जात होते. अखेर पुन्हा शिवाजीराजे चित्रपट १ अॅाक्टोबर रोजी महाराष्ट्रातील थिएटर्समध्ये रिलीज होणार आहे. चित्रपटाची पहिली झलक समोर आली आहे. या चित्रपटात नवोदित अभिनेता अभिनेता सिद्धार्थ बोडके छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाच्या पोस्टरवर राष्ट्रीय पुरस्कार विजेते बालकलाकार त्रिशो ठोसर आणि भार्गव जगताप हे दोघे पण दिसत आहेत. महाराष्ट्राच्या उज्वल भविष्यासाठी राजे येतायत… असं म्हणतं चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. राजं… राजं, हे बोल ज्या ऊर्जेने तसेच भावभावनांनी भरलेले आहे. हा टीझर काळजाला भिडणारा आहे. यामुळे आता चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. टीझरमध्ये अभिनेता सिद्धार्थ बोडके हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशातील पोशाख परिधान करून घोड्यावर बसलेला दिसत आहे. हेही वाचा : Pune : आपत्तीग्रस्तांना सिंहगड रस्त्यावरील सेवेकरी मंडळाची मदत