जेईई मेन आणि एनईईटी परीक्षा जूनमध्ये होणार ?

नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे खबरदारी म्हणून लॉकडाऊन करण्यात आलं आहे. त्यामुळे देशभरातील सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अभियांत्रिकी आणि वैद्यकीय परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र, ५ मे रोजी मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरीयल याबाबत मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे.
मंगळावरी ५ में रोजी रमेश पोखरीयल विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. त्याच वेळी जेईई मेन्स, एनईईटी परीक्षेच्या तारखांची घोषणांना करण्यात येणार आहे. जेईई मेन्स, आणि एनईईटी परीक्षा जूनच्या शेवटच्या आठवड्यात घेण्याची शक्यता आहे. ५ मे रोजी होणाऱ्या संवादात विद्यार्थी थेट मंत्र्यांना प्रश्न विचारू शकतात.
दरम्यान, नॅशनल टेस्टिंगनं एजन्सीने एप्रिलमध्ये होणाऱ्या परीक्षा कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे पुढे ढकलण्यात आली होती. मात्र देशात लॉकडाऊन असल्याने परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या.विद्यार्थाना जिथे आहे तिथेच परीक्षा देण्यासाठी मंत्रालयाने परीक्षा केंद्रात देखील बदलण्याशी संधी विद्यार्थ्यांना दिली होती. या महिण्याच्या शेवटच्या आठवड्यात परीक्षा होणार होत्या मात्र, ऐनवेळी लॉकडाऊनमध्ये बदल झाल्याने परीक्षा होऊ शकल्या नाहीत. मात्र ५ मे रोजी होणाऱ्या संवादात मंत्री काय निर्णय घेतात याकडे विद्यार्थी तसेच पालकांचे लक्ष लागले आहे.





