एकमेकांकडे बघण्याचा वाद जीवावर बेतला; डोक्यात सिमेंट ब्लॉक टाकून एक जखमी
Updated On:
पुणे – एकमेकांकडे बघण्याच्या वादातून दोघांच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक टाकून जखमी करण्यात आले. ही घटना गुलटेकडी येथे रविवारी दुपारी घडली. याप्रकरणी भीमशा मरिअप्पा पुजारी आणि गणेश राजू कांबळे यांच्यावर स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हरिष कोंढाळ (26) व आरोपी एकाच परिसरात रहातात. त्यांच्यामध्ये एकमेकांकडे बघण्यातून वाद झाला होता. या वादाचा बदला म्हणून आरोपींनी फिर्यादीचा मित्र प्रमोद व गणेश यास रस्त्यात गाठले. यांनतर त्यांना शिवीगाळ करून सिमेंटचा ब्लॉक डोक्यात टाकला. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक राठोड करीत आहेत.





