महाराष्ट्र-तेलंगणा सीमावर्ती भागातील 14 गावांचा प्रश्न सुटणार; CM फडणवीसांनी दिले महत्त्वाचे निर्देश

Maharashtra-Telangana Border | चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील १४ गावे महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमावादात अडकली आहेत. आता या १४ गावांचा प्रश्न लवकरच सुटणार आहे. राज्य सरकारने या गावांना महाराष्ट्रात सामील करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
राजुरा विधानसभेचे आमदार देवराव भोंगळे यांनी हा मुद्दा विधानसभेत मांडला. त्यांनतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि वनमंत्री गणेश नाईक या बैठकीत उपस्थित होते. बैठकीदरम्यान, केवळ या १४ गावांच्या समावेशावरच नव्हे, तर राजुरा आणि जिवती तालुक्यांतील इतर प्रलंबित समस्यांवरही चर्चा झाली.
या प्रक्रियेमुळे गावकऱ्यांना शासकीय योजना, शिक्षण, आरोग्यसेवा आणि मूलभूत सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. अनेक दशकांपासून दुर्लक्षित असलेल्या या गावांमध्ये विकासकामांना गती मिळेल. तसेच येथील नागरिकांना निश्चित ओळख व हक्क प्राप्त होतील.
१४ गावे आता महाराष्ट्रात परतणार
चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील १४ गावे महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या वादातील या गावांवर दोन्ही राज्ये आपला हक्क सांगतात. येथील नागरिकांकडे दोन्ही राज्यांचे आधार कार्ड, मतदार ओळखपत्र आणि राशन कार्ड आहेत. देशातील ही एकमेव गावे आहेत, जिथे मतदार एकाच निवडणुकीत दोन वेळा मतदान करतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानंतर चंद्रपूरमधील १४ गावे आता महाराष्ट्रात परतणार आहेत. Maharashtra-Telangana Border |
या गावांतील रहिवासी खूप वर्षांपासून महाराष्ट्रात समाविष्ट होण्याची मागणी करत होते आणि त्यांच्या या मागणीला आता सरकारकडून प्रतिसाद मिळाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशांनंतर आता लवकरच या गावांच्या महाराष्ट्रात अधिकृत समावेशासाठी अधिसूचना जारी होण्याची शक्यता आहे. Maharashtra-Telangana Border |
हेही वाचा:





