विक्रम लॅंडर क्रॅशच : अखेर भारताकडून मान्य

नवी दिल्ली : चांद्रयान दोन लॅंडर हा चंद्रावर यान पाठवण्याचा दुसरा प्रयत्न होता. हा प्रयत्न भारताच्या आंतराळ क्षेत्रातील महत्वाचा निर्णय मानण्यात येत होता. मात्र इप्सित ठिकाणाच्या आधी केवळ 500 मिटरवर हे लॅंडर क्रॅश झाले, हे भारत सरकारच्या वतीने अखेर मान्य करण्यात आले. त्याला घेऊन जाण्यारे रॉकेटमध्ये समस्या निर्माण झाल्याने हे अपयश आल्याचे सांगण्यात आले.
लोकसभेत अवकाश खात्याच्या राज्यमंत्र्यांनी याबाबत निवेदन केले. चंद्राच्या पृष्ठभागावर विक्रम लॅंडर जोरदार आदळले. हे यान उतरण्याचा पहिला टप्पा चंद्राच्या पृष्ठभागापासून 30 किमी ते 7.4 किमी दरम्यान सुरळीत पार पडला. मात्र त्याच्या दुसऱ्या टप्प्यात त्याची गती त्यात सेट केलेल्या गतीच्या तुलनेत कमी झाली. त्यामूळे लॅंडरच्या विलगीकरणाची प्रक्रिया नियोजित जागेच्या आधी सुरू झाली. त्यामुळे विक्रम त्याच्या नियोजित स्थळाच्या 500 मिटर आधी आदळला.
लॅंडरशी संपर्क तुटल्यानंतर सहा सप्टेंबर रोजी लॅंडरच्या जागेचा शोध लागला आहे. मात्र त्याच्याशी संपर्क होत नसल्याचे म्हटले होते. त्यानंतर सरकारने ही मोहीम अपयशी झाल्याचे मान्य केले नव्हते. तेथे काय झाले याचा नेमका शोध घेण्यात लागलेल्या विलंबामुळे हे मान्य करण्यास वेळ लागला.





