नेहरूंचं नाव घेत अजित पवार गटातील मिटकरींनी साधला भिडेंवर निशाणा,’नेहरूजीचं योगदान बी हाय’

मुंबई – “‘मनु’ आजोबा चंद्रावर तिरंगा फडकला. लई वाईट वाटलं असल बघा तुम्हास्नी, पण हे खरं हाय अन् यात नेहरूजीचं योगदान बी हाय म्हणत्यात. आता कसं. जयहिंद.” असं ट्विट करत अजित पवार गटातील नेते अमोल मिटकरी यांनी शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांच्यावर निशाणा साधला आहे.
“मनु” आजोबा चंद्रावर तिरंगा फडकला…लई वाईट वाटलं असल बघा तुम्हास्नी, पण हे खरं हाय अन यात नेहरूजीचं योगदान बी हाय म्हणत्यात… आता कसं 😄#जयहिंद pic.twitter.com/yVRzhVwV3F
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) August 23, 2023
काल बुधवारी संध्याकाळी 6.40 वाजता चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ‘चांद्रयान-3’ च्या लँडर मॉड्यूल ‘विक्रम’ने लॅफ्ट लँडिंग केल्याने संपूर्ण जगाने भारताचे कौतुक करण्यास सुरुवात केली. भारत हा चंद्रावर पोहोचणारा जगातील चौथा देश तर आहेच पण दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा जगातील पहिला देश बनला आहे.
ये भारत देश है मेरा… We Miss You at this moments 💐😔.. APJ an Vikram pic.twitter.com/Sc7QM15CWL
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) August 23, 2023
यावेळी मिटकरी यांनी ट्विट करत इस्रोचं अभिनंदन केलं. यासोबतच त्यांनी चांद्रयानच्या यशानंतर इस्रोचे संस्थापक विक्रम साराभाई आणि माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचीही आठवण काढली. ते म्हणाले, “हा भारत माझा देश आहे. या क्षणी अब्दुल कलाम आणि विक्रम साराभाई यांची आठवण येते आहे.





