भारत सहन करणार नाही, हे भारतीय सैन्याने पुन्हा एकदा दाखवून दिले – देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis | पहलगामवरील हल्ल्यातील दहशतवादी हे पाकिस्तानमधून आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर भारताकडून कडक पाऊले उचलण्यात आली. बुधवारी रात्री उशिरा ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून भारताने दहशतवाद्यांना प्रतिउत्तर दिले. या ऑपरेशनमध्ये 9 दहशतवादी ठिकाणांवर हल्ला करण्यात आला. यानंतर संपूर्ण देशातून लष्कराचे कौतुक केले जात आहे.
ऑपरेशन सिंदूरनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सर्व भारतीयांसाठी हा दिवस अभिमानाचा आहे. आमच्यावर झालेला हल्ला हा भारत सहन करणार नाही. भारत त्याचा योग्य पद्धतीने बदला घेईल आणि तो आज आपण घेतलेला आहे.” Devendra Fadnavis |
‘ऑपरेशन सिंदूर हे नाव अधिक बोलके’
पुढे ते म्हणाले, “ऑपरेशन सिंदूर हे नाव मला वाटते की, अधिक बोलके आहे. भारतीय सैन्याचे आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आपण सर्वांनी मिळून अभिनंदन करू. एअर स्ट्राईक करून दहशतवाद्यांचे नऊ अड्डे पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आली. यावेळी हे उद्ध्वस्त करतानाचे पूर्ण शूटिंग करण्यात आल्याने कोणाला काही बोलण्यास जागा उरलेली नाही,’ असा टोला फडणविसांंनी विरोधकांना लगावला आहे.
भारत सहन करणार नाही, हे भारतीय सैन्याने पुन्हा एकदा दाखवून दिले!
भारतीय सैन्यदलाचे हार्दिक अभिनंदन!
पाकिस्तान येथील दहशतवाद्यांचे 9 अड्डे अचूकपणे एयर स्ट्राइक करून पूर्णतः उद्ध्वस्त केल्याबद्दल मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि सर्व देशवासीयांचे मन:पूर्वक अभिनंदन!
ऑपरेशन सिंदुर हे… pic.twitter.com/zpXmz9BngA— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 7, 2025
दरम्यान, मध्यरात्री साधारणपणे दीडच्या सुमारास भारतीय हवाई दलाच्या फायटर जेट्स आणि राफेल विमानांनी पाकिस्तानमधील एकूण ९ ठिकाणी दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला. यात मोठ्या प्रमाणावर या दहशतवादी तळांचे, अतिरेक्यांचे आणि दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या यंत्रणेचे मोठे नुकसान झाले आहे. या तळांमध्ये मुंबई दहशतवादी हल्ल्याचे मास्टरमाईंड, पुलवामा दहशतवादी हल्ल्याचे म्होरके यांना प्रशिक्षण दिलं अशा दहशतवादी तळांचाही समावेश आहे. Devendra Fadnavis |
विंग कमांडर व्योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती
दरम्यान, सकाळी १०.३० च्या सुमारास भारतीय लष्कराच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन त्यात ऑपरेशन सिंदूरसंदर्भात माहिती दिली. कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी मोहिमेची माहिती देताना प्रत्येक मुद्द्यावर लष्कराची सविस्तर भूमिका मांडली. Devendra Fadnavis |
हेही वाचा:
Mahayuti : मुख्यमंत्री म्हणतात निवडणूक एकत्र लढू, पण एकनाथ शिंदे अजित पवार ऐकणार का?





