Nevasa News : गोगलगावात स्वच्छता गृहांचा लोकार्पणाचा कार्यक्रम संपन्न

नेवासा : नेवासा तालुक्यातील गोगलगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसह सुदामराव मते पाटील विद्यालयामध्ये द क्लियरिंग कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या उपक्रमाअंतर्गत सी एस आर फंडातून दोन्हीही विद्यालयांना सुमारे १८ लाख रुपये खर्चाचे मुलामुलींसाठी स्वच्छता गृहे बांधण्यात आली. या स्वच्छतागृहांचा लोकार्पणाचा कार्यक्रम पार पडला.
यावेळी झालेल्या स्वच्छता गृहे लोकार्पण कार्यक्रम प्रसंगी आदर्शगाव गोगलगावचे माजी सरपंच योगेशभाऊ म्हस्के उपस्थित होते. तर स्वच्छतागृहे बांधण्यासाठी सदरचा फंड उपलब्ध करून देणारे शाळेचे माजी विद्यार्थी आणि द क्लियरिंग कार्पोरेशन इंडिया लिमिटेडचे अधिकारी सुनील कैलास साळुंके, राहुल बिडवे, केंद्रप्रमुख रविंद्र कडू सर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी बोलताना द क्लियरिंग कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड कंपनीचे अधिकारी व माजी विद्यार्थी सुनील साळुंके यांनी गोगलगाव हे आदर्शगाव असल्याने तसेच माजी सरपंच योगेशभाऊ म्हस्के यांनी सीएसआर फंडातून निधी उपलब्ध होण्यासाठी पाठपुरावा केल्यामुळे १८ लाख रुपये खर्चाची ही वयक्तिक स्वच्छता गृहे या शाळांना उपलब्ध झाली असल्याचे सांगून स्वच्छतेचे व निरोगी जीवनाचे महत्व आपल्या भाषणातून विषद करून मुलांमध्ये प्रबोधन केले.
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक भारस्कर सर यांनी आलेल्या प्रमुख अतिथींचे स्वागत करून प्रास्ताविक केले. द क्लियरिंग कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड कंपनीने आदर्शगाव गोगलगावची निवड या उपक्रमासाठी केल्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांची चांगली सोय झाली. यामुळे कंपनीचे अधिकारी यांना धन्यवाद देत त्यांनी आभार मानले. उपस्थित अतिथींचा यावेळी सत्काराद्वारे सन्मान करण्यात आला.
यावेळी कर्वे समाज संस्थेचे राहुल बिडवे यांनी मुलांना मार्गदर्शन केले, तर गोगलगावचे माजी योगेश सरपंच योगेश म्हस्के यांनी अध्यक्षीय मनोगतात द क्लियरिंग कार्पोरेशन ऑफ इंडियाचे अधिकारी सुनील साळुंके हे विद्यालयाचे माजी विद्यार्थी असल्याने त्यांना मी आपल्या योजनेसाठी गावाची निवड करावी म्हणून मागणी केली वेळोवेळी पाठपुरावा ही केला. त्यामुळेच स्वच्छता गृह सेवेचा लाभ आज गावातील शाळांना मिळाला याबाबत समाधान व्यक्त केले. येथून पुढे ही गावासाठी जे काही करता येईल त्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी कैलास साळुंके, नजीक चिंचोली येथील निवृत्ती कर्डीले, गोंडेगाव येथील रामचंद्र गजभार, गोरे सर, गोगलगाव येथील नवथर सर, घावटे सर, दिघी येथील पवार सर, गोवर्धन काळे, बाभूळखेडा येथील फंड सर, गिडेगाव येथील सरपंच भगवान कर्डीले, शिंदे सर, विद्यालयाचे घुले सर, गायकवाड सर, म्हस्के सर यांच्यासह विद्यार्थी पालक गावकरी उपस्थित होते.





