Satara News : जातीनिहाय जनगणनेचे महत्व तळागाळापर्यंत पोहचवणार : समीर भुजबळ

फलटण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जातीनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली केंद्र सरकारच्या वतीने नजीकच्या काळात जातीनिहाय जनगणना होईल. ओबीसींच्या आरक्षणासंदर्भात अनेक प्रश्न आहेत, वेळोवळी निघणाऱ्या मुद्द्यांचे निराकारण जातनिहाय जनगणनेतून होणार आहे. यासाठी जातीनिहाय जनगणनेचे महत्व तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी तीव्र लढा उभारला जाणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष माजी खासदार समीर भुजबळ यांनी दिली.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचेवतीने संपूर्ण महाराष्ट्रातील विदर्भ मराठवाडा नंतर सातारा जिल्ह्यातील फलटण येथे जिल्हा स्तरावरील बैठक संत सावता महाराज मंदिर येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी भुजबळ बोलत होते.
समीर भुजबळ म्हणाले, भाटिया कमिशनमुळे ओबीसी आरक्षण कमी झाले होते समता परीरिषदेच्या माध्यमातून सुप्रिम कोर्टात याचिका दाखल करून ओबीसी राखले असले तरी आपण संघटत जागृत राहिले पाहिजे. तळागाळातील लोकांपर्यंत जातनिहाय जनगणनेचे महत्व समजावून सांगणे, जातीनिहाय जनगणनेत भाग घेणं किती आवश्यक असून सर्व जाती जमातींच्या नागरिकांनी काळजीपूर्वक जागृतपणे आपल्या नोंदी करणे गरजेचे आहे.
अ. भा. महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने समता परीषदेच्या संघटन मजबूत बांधणी संदर्भात आढावा बैठका घेऊन येणाऱ्या काळात जातीनिहाय जनगणनेसंदर्भात लोकांना प्रबोधन, मार्गदर्शन करण्यासाठी विभागवार बैठकाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ, प्रदेश उपाध्यक्ष अंबादास गारुडकर, प्रदेश चिटणीस डॉ. स्नेहा सोनकाटे, प्रदेश प्रचारक प्रा. संतोष विरकर, डॉ. नागेश गवळी, जिल्हाध्यक्ष राजेंद्र नेवसे, फलटण तालुका भाजपचे तालुकाध्यक्ष पै. बजरंग गावडे, समता परिषदेचे प्रसिद्धी प्रमुख दशरथ फुले, प्रदेश प्रवक्ते दशरथ ननावरे, तालुकाध्यक्ष महादेव क्षीरसागर, तालुकाध्यक्ष राजेंद्र कोरडे, डॉ. बी. के. यादव, बाळासाहेब ननावरे, ॲड. महेश गोरे, शंकर गोसावी, संजय करपे, ॲड. सुनील नेवसे, प्रा. संपतराव नेवसे, शिवलाल गावडे, पिंटू इवरे,बाळासाहेब शेंडे, शरद कोल्हे, गिरीष बनकर, प्रा वसंतराव अडसूळ, अरविंद राऊत, शाहीर फरांदे, प्रकाश फरांदे, अमोल रासकर, माधव जमदाडे, विकास नाळे, वैभव नाळे, कुंडलिक नाळे, बापुराव कर्णे, रमेश शिंदे , विवेक शिंदे, विक्रम पखाले, सुजीत जाधव , दत्तात्रय बरळ, संदीप नेवसे, पोपटराव दगडे, बापूराव काशिद, सहदेव शेंडे, डॉ युवराज कोकरे, बापुराव राऊत, सोपानराव जाधव, राजेद्र भागवत व समता सैनिक उपस्थित होते





