Rasika Sunil : नवऱ्याने केली ‘ती’ कृती अन् रसिका सुनीलला अश्रू अनावर! अभिनेत्री व्हिडिओ शेअर करत म्हणाली…

Updated On:
Rasika Sunil : नवऱ्याने केली ‘ती’ कृती अन् रसिका सुनीलला अश्रू अनावर! अभिनेत्री व्हिडिओ शेअर करत म्हणाली…

झी मराठी या वाहिनीवरील माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला. या मालिकेतील शनाया हे पात्र साकारणारी अभिनेत्री रसिका सुनील हि घरोघरी पोहचली. तिने या मालिकेत साकारलेली खलनायकाची भूमिका सर्वांच्या लक्षात राहिली. रसिका हि सतत तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट व्हिडिओ शेअर करत असते. पण यावेळी रसिकाने तिच्या नवऱ्याने अशी काही कृती केली त्यामुळे ती भावूक झाली आहे. याची पोस्ट तिने तिच्या इन्स्टाग्रावर शेअर केली आहे.

रसिका ज्या श्वानाला भाऊ मानते त्याचा आज वाढदिवस आहे. या श्वानाचे नाव रश असून रसिकाच्या नवऱ्याने रशसारखाच बर्फाचा श्वान करून अनोख्या पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. नवऱ्याची ही कृती पाहून रसिकाला अश्रू अनावर झाले. याचा व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

आमच्या लहान बाळासाठी आमचं हे प्रेम अतुलनीय आहे. आदित्य हा व्हिडीओ रेकॉर्डिंग करताना तुझी परवानगी घेतली नाही, यासाठी सॉरी. आज ‘रश’चा वाढदिवस आहे. ‘रश’ हे आमचं बाळ आहे, असे रसिकाने शेअर केलेल्या व्हिडीओत म्हटले आहे. तिने शिअर केलेल्या व्हिडिओला इतर कलाकार मंडळी आणि चाहते भरभरून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. रसिका नेहमी ‘रश’बरोबरचे तिचे सुंदर फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमी शेअर करत असते. रसिकाच्या ‘रश’ नावाच्या या श्वानाला आता चार वर्षे झाली आहेत.

ती भारतात अन् तो अमेरिकेत

२०२१ मध्ये अभिनेत्री रसिका सुनील आणि आदित्य बिलागीशी याच्याशी लग्नबंधनात अडकली. या दोघांचे लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. दोघांनी एकमेकांना काही वर्ष डेट केल्यानंतर गोव्यात मोठ्या थाटात त्यांनी लग्न केले. तिचा नवरा आदित्य अमेरिकेतील एका कंपनीत जॅाबला आहे. सध्या रसिका भारतात तर आदित्य अमेरिकेत आहे.

आणखी संबंधित बातम्या

Ashok Saraf : 'मला साखर आहे, गूळ कुठे आहे?' अशोक सराफांच्या भन्नाट उत्तराचा संकर्षण कऱ्हाडेंनी सांगितला किस्सा!

2026-10-22 16:32:34

Ashok Saraf : 'मला साखर आहे, गूळ कुठे आहे?' अशोक सराफांच्या भन्नाट उत्तराचा संकर्षण कऱ्हाडेंनी सांगितला किस्सा!

Urmila Kanetkar: ‘एक अपूर्ण प्रेमकहाणी…’ उर्मिला कानेटकरच्या पोस्टने वेधलं लक्ष

2026-10-22 13:13:10

Urmila Kanetkar: ‘एक अपूर्ण प्रेमकहाणी…’ उर्मिला कानेटकरच्या पोस्टने वेधलं लक्ष

Lalit Prabhakar: 'मी नामदेव ढसाळ आणि मी एक दलित..."; ललित प्रभाकरचा 'ढसाळ' सिनेमातील लक्षवेधी लूक समोर

2026-10-22 09:17:25

Lalit Prabhakar: 'मी नामदेव ढसाळ आणि मी एक दलित..."; ललित प्रभाकरचा 'ढसाळ' सिनेमातील लक्षवेधी लूक समोर

Prajakta Mali : प्राजक्ता माळी पुन्हा एकदा निर्मितीची धुरा सांभाळणार; नव्या सिनेमाचे पोस्टर रिलीज

2026-10-21 13:35:56

Prajakta Mali : प्राजक्ता माळी पुन्हा एकदा निर्मितीची धुरा सांभाळणार; नव्या सिनेमाचे पोस्टर रिलीज

Lalit Prabhakar: ‘आदित्य’पासून ‘अजमल’पर्यंतचा प्रवास! ललित प्रभाकर म्हणतो, प्रत्येक भूमिकेनं मला नवं काही शिकवलं

2026-10-21 08:07:39

Lalit Prabhakar: ‘आदित्य’पासून ‘अजमल’पर्यंतचा प्रवास! ललित प्रभाकर म्हणतो, प्रत्येक भूमिकेनं मला नवं काही शिकवलं