Lalit Prabhakar: ‘मी नामदेव ढसाळ आणि मी एक दलित…”; ललित प्रभाकरचा ‘ढसाळ’ सिनेमातील लक्षवेधी लूक समोर
Lalit Prabhakar : ‘ढसाळ’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

Lalit Prabhakar : दलित पँथर आणि विद्रोही कवी नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर आधारित ‘ढसाळ’ या चरित्रपटाची घोषणा झाल्यापासून या चित्रपटाबाबत अनेकांना मोठी उत्सुकता लागली आहे.
विशेष म्हणजे ‘प्रहार’मध्ये अजमल कसाबची भूमिका साकारल्यानंतर आता अभिनेता ललित प्रभाकर विद्रोही कवी नामदेव ढसाळ यांच्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे.
या चित्रपटात तो विद्रोही कवी नामदेव ढसाळ यांच्या तरुणपणीची भूमिका साकारत आहे. नुकताच ‘ढसाळ’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. यामधून ललितचा दमदार लुक पाहायला मिळत आहे. या टीझरमधील “मी ढसाळ, नामदेव ढसाळ आणि मी एक दलित आहे” हा संवाद म्हणताना ललितचा अंदाज लक्ष वेधून घेत आहे.
चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक वरुण राणा यांनी सोशल मीडियावर या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला असून याला “मी ढसाळ, नामदेव ढसाळ… आणि मी एक दलित आहे. जय भीम”. पुढे “ढसाळ – भेटूया महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला, एप्रिल २०२७मध्ये चित्रपटगृहात” अशी कॅप्शन देण्यात आली आहे. हा चित्रपट पुढील वर्षी एप्रिलमध्ये प्रदर्शित होणार आहे.
View this post on Instagram
वरुण राणा लिखित व दिग्दर्शित ‘ढसाळ’ हा चित्रपट विद्रोही कवी आणि नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर विशेष करुन त्यांच्या तरुणपणातील घडामोडींवर आधारित असल्याचं म्हटलं जात आहे. नामदेव ढसाळ यांच्या आयुष्यातील कोणते प्रसंग चित्रपटातून उलगडणार आणि ललित ही व्यक्तिरेखा पडद्यावर कशी साकारणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
संजय पांडेय आणि दि बायोस्कोप फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती वरुणा मदनलाल राणा, संजय पांडे यांनी केली असून लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारीही त्यांनीच सांभाळली आहे. नामदेव ढसाळ यांच्या जीवनातील संघर्ष, त्यांच्या विचारांमधील विद्रोह आणि समाजव्यवस्थेला प्रश्न विचारण्याची त्यांची निर्भीड वृत्ती यांचा वेध या चित्रपटातून घेतला जाणार आहे.
Signal system : सिग्नल यंत्रणेतील बिघाड ठरू शकतो वाहतूक कोंडी; अपघाताचे कारण





