मुंबईत राहणारा “हिंदू खतरे में है”; ठाकरे सरकारवर नितेश राणेंचा खोचक टोला

मुंबई – भारतातही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे अनेक गोष्टींवर निर्बंध लावण्यात आले असून अनेक धार्मिक कार्यक्रम आणि उत्सवही रद्द करण्यात आले. आषाढी वारीही कोरोनाच्या सावटातच पार पडली, तर दहीहंडी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आली.
यंदाचा गणेशोत्सवावरही कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने करण्याचा निर्णय अनेक मंडळांनीही घेतला आहे. अशातच यंदाच्या गणेशोत्सवासाठी मुंबई महानगरपालिकेने नियमावली जाहीर केली आहे.
हिंदू समाज.. हिंदू सण.. हिंदू संस्कृती वर नियोजित पद्धतीने हल्ले केले जात आहेत.
आणि तेही महाराष्ट्र सरकारच्या मदतीने..
असंख्या घटना कानावर येत आहेत.. पश्चिम बंगाल सारखा मुंबईत राहणारा “हिंदू खतरे में है” असं सांगण्याची वेळ आली आहे!!!— nitesh rane (@NiteshNRane) August 6, 2021
दरम्यान, करोनाचा शिरकाव झाल्यापासून सरकारकडून सण उत्सवांसाठी नियमावली ठरवून दिली जात असून, याच मुद्यावरून भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
त्यांनी ट्विट केले आहे की,’हिंदू समाज, हिंदू सण, हिंदू संस्कृतीवर नियोजित पद्धतीने हल्ले केले जात आहेत. महाराष्ट्र सरकारच्या मदतीनं हे हल्ले होत असल्याचं गंभीर आरोप त्यांनी केला. असंख्या घटना कानावर येत आहेत. पश्चिम बंगालसारखं मुंबईत राहणारा “हिंदू खतरे में है” असं सांगण्याची वेळ आली आहे. असं म्हणत नितेश राणेंनी शिवसेनेचं नाव न टोला लगावला.





