आरोग्य सेतू ऍप लवकरच फिचर फोनवरही
Updated On:

पुणे – केंद्र सरकारने करोना विषाणूशी लढा देण्यासाठी सुरू केलेले आरोग्य सेतू देशभरात लोकप्रिय झाले आहे. मात्र, सध्या हे ऍप फक्त स्मार्ट फोनवर उपलब्ध आहे.
भारतामध्ये बरेच लोक अजूनही फिचर फोन वापरतात. त्यासाठी हे ऍप फीचर फोनसाठी विकसित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. एखाद्या ग्राहकाने हे ऍप डाऊनलोड केल्यानंतर या ग्राहकांच्याजवळ एखादा करोनाबाधित रुग्ण असेल तर त्याची माहिती मिळते. त्यामुळे या नागरिकाला सुरक्षितता वाढविण्यास मदत होते.





