Uddhav Thackeray | मराठी भाषेच्या मुद्द्यावर वरळीतील डोम सभागृहात तब्बल २० वर्षानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले. यावेळी राज ठाकरेंसह उद्धव ठाकरेंनी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. आम्हा दोघांमधला अंतरपाट अनाजीपंतांनी दूर केला. एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी, असा टोला यावेळी उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता फडणवीसांना लगावला. काय म्हणाले उद्धव ठाकरे? आज आमच्या भाषणापेक्षा आमचं एकत्र दिसणं महत्वाचं आहे. आम्हा दोघांमधला अंतरपाट अनाजीपंतांनी दूर केला. एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी. आज भोंदूबाबा-महाराज व्यस्त असतील, कोणी टाचण्या टोचतंय, कोणी अंगारे धुपारे करतंय, कोणी रेडे कापतंय, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. Uddhav Thackeray | माझ्या आजोबांनी या भोंदूपणा विरोधात लढा दिला होता आणि त्यांच्यासाठी आम्ही एकत्र आलो आहे. वापरायचं आणि फेकून द्यायचं, असं यांचं काम आहे. आता आम्ही दोघे तुम्हाला फेकून देऊ. तुमच्या डोक्यावर बाळासाहेब ठाकरे यांचा हात नसता तर कुठे असता तुम्ही?, असेही त्यांनी यावेळी म्हटले. Uddhav Thackeray | भाजप ही अफवांची फॅक्टरी “राजने सगळ्यांची शाळा काढली, मला एक प्रश्न पडला आहे, नरेंद्र मोदी यांची शाळा कोणती? सगळ्यात उच्चशिक्षित आहेत. भाजप ही अफवांची फॅक्टरी आहे. मधल्या काळात यांनी सुरु केलं होतं, की उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं, पण हिंदुत्व ही कुठल्याही भाषेची मक्तेदारी नाही. आम्ही अस्सल मराठी बोलणारे तुमच्याहीपेक्षा जास्त कडवट, कट्टर देशाभिमानी हिंदू आहोत. तुम्ही काय आम्हाला हिंदुत्व शिकवणार?” असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारला. Uddhav Thackeray | ..तर आम्ही गुंड आहोत “महाराष्ट्रात मराठी माणूस न्याय मागत असेल आणि तुम्ही त्याला गुंड म्हणत असाल तर आम्ही गुंड आहोत. हिंदी सक्ती आम्ही लावून घेत नसतो. मराठी माणूस मुंबई बाहेर नेला, असं तुम्हाला वाटत असेल तर 2014 नंतर मुंबईतील उद्योगधंदे गुजरातला कसे गेले? तुम्ही आमच्यात गद्दारी घडवली आणि आमचं सरकार पाडलं. तुमचे मालक तिकडे गुजरातला बसले आहेत. दोन व्यापारी त्यांच्यासाठी तुम्ही हे करत आहात,”अशी टीका उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाजपवर केली. हेही वाचा : “बाळासाहेब ठाकरेंसह अनेकांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं”; राज ठाकरेंचा टोला