Sanjay Raut : सरकार मोदींचं, सिस्टम मात्र राहुल गांधींची; संजय राऊतांचा मोदींवर हल्लाबोल

मुंबई : राज्य सरकारने नुकतंच १०० दिवसांचं रिपोर्ट कार्ड जाहीर केलं आहे. यावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण सुरु झालं आहे. दुसऱ्या बाजूला, काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. याबाबत राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. तसेच केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली आहे. Sanjay Raut |
सरकारने आगामी जगणननेसोबतच जातीनिहाय जनगणना करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. मात्र, केंद्र सरकारच्या या निर्णयावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टोला लगावला आहे. जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय जरी सरकारने घेतला असला तरी, या निर्णयाचं श्रेय देशातील जनतेनं काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना दिलं आहे. सरकार मोदींची आणि सिस्टम राहुल गांधींचं सुरू आहे, असं संजय राऊत म्हणाले. Pm Narendra Modi
संजय राऊत म्हणाले, जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय जरी सरकारने घेतला असला तरी, या निर्णयाचं श्रेय देशातील जनतेनं काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना दिलं आहे. सरकार मोदींची आणि सिस्टम राहुल गांधींचं सुरू आहे. राहुल गांधी यांनी जातीनिहाय जनगणना करण्याचा मुद्दा सातत्याने धरून ठेवला होता. त्यामुळे केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे, असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. Rahul gandhi |
तसेच जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून अशा वेळी घेण्यात आला, ज्यावेळी देशातील जनता पहलगाम हल्ल्यावरून सरकारला प्रश्न विचारत आहे. पण जातीनिहाय जनगणना करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेत मोदी सरकारनं जनतेचं लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोपही खासदार संजय राऊत यांनी यावेळी केला.
पुढे बोलताना म्हणाले, पहलगाम हल्ल्यानंतर सरकारला प्रश्न विचारले जात आहेत. त्यावरुन समजाच लक्ष बाजूला व्हावं, म्हणून देश युद्धाच्या छायेत असताना, त्यांनी हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. बिहार, पश्चिम बंगालची निवडणूक आहे. राहुल गांधींच्या भूमिकेपुढे सरकारला गुडघे टेकावे लागले” असं संजय राऊत म्हणाले. Sanjay Raut |





