Nagar | शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेशाची महिमा जगप्रसिद्ध : आ.प्रविण माळी

नगर, – शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेशाची महिमा जगप्रसिद्ध आहे. नगर येथे आलो असता श्री विशाल गणेशाचे दर्शन घेतल्याने मन प्रसन्न झाले.
मंदिराचे भव्य दिव्य स्वरुप पाहुण एक वेगळे वैभव या मंदिरात दिसले. येथे सुरु असलेले जिर्णोद्धाराचे काम अतिशय कोरीव काम सुंदर असे झाले असल्याने सर्वांचे लक्ष या कोरीव काम कडे जात आहे.
ज्या भक्तीभावाने भक्त या मंदिरात येतो, त्याच भक्तीभावाने श्री विशाल गणेश दर्शन होत असल्याचे प्रतिपादन गुजरातचे आमदार प्रविणभाई गोवर्धन माळी यांनी केले.
शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर येथे गुजरातचे आमदार प्रविणभाई गोवर्धन माळी यांनी भेट दिली असता त्यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष अॅड.अभय आगरकर, उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, विश्वस्त पांडूरंग नन्नवरे, नितीन पुंड, सचिन पारखी, प्रशांत मुथा, पंडित वाघमारे, राजेंद्र शेलार, संजय कोके आदी उपस्थित होते.




