Pune District : संत्री, आकर्षक फुलांनी सजविले पांडुरंगाचे द्वार

आळंदी : नववर्षानिमित्त सोळू (ता. खेड ) येथील फुलांचे जुने सुप्रसिद्ध व्यापारी व एक धार्मिक कुटुंब प्रदीप प्रकाश ठाकूर यांनी गेल्या आठ वर्षांपासून सुरू असलेली परंपरा यंदाही जपली. 31 डिसेंबर 2024 रोजी ठाकूर परिवाराने सुमारे 5 हजार संत्र्यांची आरस त्याचबरोबर तीनशे किलो विविधरंगी आकर्षक सुंदर फुलांनी रुक्माई सह पांडुरंगास सजविण्यात आले होते.
गेल्या आठ वर्षांपासून पंढरीच्या विठुरायाला एक जानेवारीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 31 डिसेंबर रोजी श्री पांडुरंग विठ्ठल रुक्माईचे संपूर्ण मंदिर, गाभारा तसेच परिसर दरवर्षी फळे व सुगंधी फुलांचे वापराने मंदिराला सुमारे 20 कारागीर घेऊन, रात्रभर मंदिर व परिसर सजवतात.दरम्यान, संत नामदेव पायरी व संपूर्ण मंदिर परिसराला आकर्षक अशा फुलांनी सजविण्यात आले होते.
गेली आठ वर्षांपासूनची ही मंदिर सजवण्याची परंपरा अगदी स्वखर्चातून जपली जात आहे, असे प्रदीप ठाकूर, व ठाकूर परिवाराने सांगितले. सुमारे 20 कामगारांनी सुंदर आकर्षक आरस मंदिराला केली होती. यंदा देखील मंदिर सजवण्याच्या कामी प्रकाश ठाकूर, प्रदीप ठाकूर, अरविंद देवकर, दादासाहेब दातीर पाटील आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी या परिवाराचा समितीच्या वतीने यथोचित असा सन्मान केला.





