Nagpur school with curtains : विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला… नागपूरातील या गावात पडदे टाकून बनवल्या वर्गखोल्या; नेमकं प्रकरण काय?

Nagpur school with curtains : राज्य सरकारडून शिक्षण क्षेत्रात नवीन कल्पना आणल्या जात आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य कशा प्रकारे उंचावले पाहिजे यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत, असे असले तरी राज्यातील शासनामार्फत चालविल्या जाणाऱ्या शाळांची परिस्थिती फार काही चांगली नाही. सध्या नागपूर जिल्ह्यातील एका गावातील शाळेत चक्क वर्गखोल्यांची विभागणी लावून करण्यात आली आहे. यामुळे ही शाळा आता मोठा चर्चेचा विषय बनली आहे. शिक्षण क्षेत्रातील विदारक चित्र समोर आल्याने विविध प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.
एका मोठ्या हॅालमध्ये ही शाळा भरवली जात असून, पडदे लावून वर्गांची विभागणी केली आहे. या धक्कादायक प्रकारामुळे विद्यार्थ्यांचे भवितिव्य टांगणीला असल्याची चर्चा होत आहे. या शाळेत दहावीपर्यंतचे शिक्षण मिळत दिले जात असून ११० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यामुळे आता या विद्यार्थ्यांना शाळा मिळणार कधी असा प्रश्न निर्माण झाला आहे.
नेमकं प्रकरण काय?
नागपूर जिल्ह्यातील शिवणगांव येथे ही शाळा भरते. येथील एका मोठ्या हॅालमध्ये १० पर्यंतच्या वर्गांची विभागणी ही पडदे लावून करण्यात आली आहे. शिक्षक शिकवताना एका ठिकाणचा आवाज दुसरीकडे जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत. नागपूरच्या पुनर्वसित शिवणगांव येथे ही शाळा भरत आहे.
या ठिकाणी पूर्वीची शाळासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले होते. मात्र, गावाचं पुनवर्सन झाले आणि नवीन ठिकाणी आले. या मुलांच्या शाळेची कोणतीही वेगळी व्यवस्था अद्यापही करण्यात आलेली नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने लवकरात लवकर मुलांच्या शाळेची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
या प्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक उदय जुमळे यांनी एका वाहिनीला याविषयी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनुसार, “येथे ५ ते १० चे जवळपास ११० विद्यार्थी आहेत. हे सत्र २० जुन २०२५ पासून येथे सुरू झाले आहे. येथे आम्ही वर्ग सुरू केलेले आहेत. त्याअगोदर आम्ही मे महिन्यामध्ये येथे शाळा सुरू केली होती, अशी माहिती त्यांनी दिली आहे. यामुळे आता या विद्यार्थ्यांना शाळा कधी मिळणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
हेही वाचा : अमेरिकेसोबत व्यापार कराराच्या आशेने बाजार उत्साहित ; सेन्सेक्स १२२ अंकांनी वधारला, निफ्टीही २५५०० च्या जवळ





