कुलीची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला; सुपरस्टार रजनीच्या लूकची होतेय चर्चा..

Coolie movie Rajinikanth : सुपरस्टार रजीनकांत यांच्या कुली चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. नुकताच या चित्रपटातील एक प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. या प्रोमोत रजनीकांतचा दमदार लूक पाहायला मिळत आहे. कुली या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट १४ अॅागस्ट २०२५ रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.
लोकेश कनागराज दिग्दर्शित कुली हा चित्रपट एक अॅक्शन थ्रिलर चित्रपट असणार असणार आहे. या चित्रपटातील एक प्रोमो X वर शेअर करताना सन पिक्चर्सने लिहिले, “अरंगम अधिरत्तुम्मे, व्हिसल परक्कट्टुमे! #CoolieIn100Days #Coolie Worldwide 14 ऑगस्टपासून.” या प्रोमोमध्ये नागार्जुन अक्किनेनी, उपेंद्र राव, सौबिन शाहीर आणि सत्यराज यांच्यासह रजनीकांतची झलक पाहायला मिळत आहे. यामुळे चित्रपटाच्या टीझर आणि ट्रेलर कधी रिलीज होणार यासाठी चाहते आतुर झाले आहेत.
या चित्रपटाला साऊथमधील लोक्रप्रिय गायक आणि संगीतकार अनिरुद्ध रविचंदर याचे संगीत लाभलेले आहे. ‘कुली’ हा रजनीकांतचा १७१ वा चित्रपट आहे. या चित्रपटात रजनीकांत ‘देवा’ नावाच्या भूमिकेत दिसणार आहे. रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट सोन्याच्या तस्करीच्या कथेवर आधारित असणार असून रजनीकांत यांची विशेष आणि लक्षवेधी भूमिका असणार आहे.
या चित्रपटात श्रुती हासन, रेबा मोनिका जॉन आणि पूजा हेगडे (एका खास नृत्य क्रमांकात) यांच्याही भूमिका आहेत. बॉलिवूड स्टार आमिर खानचा कॅमिओ देखील या चित्रपटात असणार असल्याचे सांगितले जात आहे. अनिरुद्धचे संगीत आणि गिरीश गंगाधरन यांचे छायाचित्रण यामुळे कुली भव्य स्वरुपाचा चित्रपट असणार असे म्हटले जात आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण मार्च २०२५ मध्ये पूर्ण झाले आहे. आता १०० दिवसांनंतर हा चित्रपट रिलीज करण्यात येणार आहे. सोशल मीडियावर CoolieIn100Days असा ट्रेन्ड राबविला जात आहे.





