कोल्हापूरातील पहिला मानाच्या गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात; ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष
Updated On:

Ganpati visarjan 2025। आज राज्यभरात गणेश विसर्जनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. सकाळपासून आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी गणेशभक्तांची मांदियाळी रस्त्यांवर पाहायला मिळत आहे. गणपती बप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर चा जयघोष केला जात आहे. कोल्हापूरातील मानाच्या पहिल्या गणपती विसर्जन मिरवणूकीला सुरुवात झाली आहे.
या विसर्जन मिरवणुकीत मोठ्या प्रमाणावर गणेश भक्त सहभागी झाले आहेत. तुकाराम माळी मंडळाचा मानाचा गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरूवात झाली असून, कोल्हापूरचे खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते गणपतीची आरती करून मिरवरणुकीला प्रारंभ झाला आहे.





