14 फेब्रुवारी हा व्हॅलेंटाईन डे आहे. मात्र, प्रेमाचा हा आठवडा व्हॅलेंटाइन डेच्या आधी सुरू होतो. प्रेमाचे टप्पे पार करून, शेवटच्या दिवशी व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. 7 फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाईन वीक सुरू होत आहे. व्हॅलेंटाईन वीकच्या पहिल्या दिवशी ‘रोझ डे’ साजरा केला जातो. रोझ डे म्हणजे गुलाब दिवस. गुलाबाला भावना व्यक्त करण्याचे प्रतीक मानले जाते. गुलाबाच्या प्रत्येक रंगाचा वेगळा अर्थ असतो. सध्या बाजारपेठ विविध प्रकारच्या गुलाबांनी भरलेली आहे. वेगवेगळ्या रंगांचे गुलाब सिंगल्सच्या हृदयात आशा आणतात. पण रोझ डे हा केवळ प्रेम करणाऱ्या जोडप्यांसाठी नाही. प्रत्येकजण हा दिवस साजरा करू शकतो. रोझ डे साजरा करण्यामागील कारण आणि सेलिब्रेशनची योग्य पद्धत जाणून घेतल्यास तुम्हीही तो साजरा करू शकता. चला जाणून घेऊया व्हॅलेंटाईन वीक फक्त रोज डे ने का सुरु होतो? रोझ डे चा इतिहास काय आहे आणि गुलाब प्रेमींसाठी खास का आहे? व्हॅलेंटाईन वीक 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी दरम्यान साजरा केला जातो. रोज डे व्हॅलेंटाईन वीकच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 7 फेब्रुवारीला साजरा केला जातो. या दिवशी लोक आपल्या जोडीदाराला, मित्राला किंवा खास व्यक्तीला गुलाब देऊन आपल्या भावना व्यक्त करतात. * रोझ डे का साजरा केला जातो ? गुलाब हे प्रेमाचे प्रतीक मानले जाते. गुलाबाचे रंग भावना व्यक्त करतात. व्हॅलेंटाईन आठवडा तुमच्या मनाला व्यक्त करण्याची संधी देतो. म्हणूनच रोझ डे हा प्रेमळ जोडप्यांसाठी खास असतो. ते त्यांच्या प्रिय व्यक्तीला गुलाब देऊन हृदयात दडलेले प्रेम व्यक्त करू शकतात. जर तुमचे कोणावर प्रेम असेल तर तुम्ही त्यांना गुलाबाचे फूल देऊ शकता. याशिवाय जर तुम्हाला कोणाशी मैत्री करायची असेल, किंवा कोणाला खूप आदर द्यायचा असेल किंवा अगदी तुमच्या शत्रूशी द्वेष मिटवून हस्तांदोलन करायचे असेल तर तुम्ही खास रंगांचे गुलाब देऊन हा दिवस साजरा करू शकता. * रोझ डे चा इतिहास व्हॅलेंटाईन वीकमध्ये रोझ डे साजरा करण्याची एक खास गोष्ट आहे. मुघल बेगम नूरजहाँ यांना लाल गुलाब खूप आवडायचे. बेगमला खुश करण्यासाठी जहांगीर रोज एक टन ताजे गुलाब नूरजहाँच्या राजवाड्यात पाठवत असे. त्यांची ही प्रेमकथा खूप गाजली होती. याशिवाय एक कथा राणी व्हिक्टोरियाच्या काळातील आहे. त्या काळातील लोक त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी एकमेकांना गुलाब देत असत. या परंपरेनुसार व्हॅलेंटाईन वीकमधील एक दिवस ‘रोझ डे’ म्हणून साजरा केला जातो. * गुलाबाच्या वेगवेगळ्या रंगांचा अर्थ काय? . लाल गुलाब – तुम्हाला तुमचे प्रेम व्यक्त करायचे असलेल्या व्यक्तीला ते द्या. . गुलाबी गुलाब – तुम्ही तुमच्या जिवलग मित्राला देऊन मैत्री आणखी घट्ट करू शकता. . पिवळा गुलाब – जर तुम्हाला कोणाशी मैत्री करायची असेल तर त्याला पिवळे गुलाब द्या. . केशरी रंगाचे गुलाब – जर तुम्हाला कोणी आवडत असेल तर त्याला केशरी रंगाचे गुलाब देऊन त्याच्यासमोर भावना व्यक्त करा. . पांढरा गुलाब – एखाद्याशी वैर संपवून माफी मागायची आहे तर त्याला पांढरा गुलाब द्या. ते शांततेचं प्रतीक आहे.